0
वाद वाढल्यानंतर नित्यानंद राय म्हणाले, मी म्हणीचा वापर केला होता. पण मी माझे वक्तव्य मागे घेतो.

पाटणा - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निर्माण होणाऱ्या प्रश्नांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, मोदींकडे बोट उगारणाऱ्याचा हात आणि सर्व मिळून तोडू आणि गरज पडल्यास कापून टाकू. पण नंतर त्यांनी त्यांच्या वक्तव्यावर दुःखही व्यक्त केले. दुसरीकडे लालूप्रसाद यादव म्हणाले की, भाजपला कशाचा अहंकार आहे. त्यांच्याकडे गर्व करण्यासारखे काहीही नाही.

खासदार नित्यानंद यांनी हे वक्तव्य वंशी साह उर्फ वंशी चाचा यांच्या शहीदत्व दिनाच्या निमित्ताने केले. ते म्हणाले, देशातील गरीबाचा मुलगा पंतप्रधान बनला आहे. त्यासाठी देशातील प्रत्येक व्यक्तीने सर्वाच्या पुढे जाऊन विचार करत याचा स्वाभिमान बाळगला पाहिले. त्यामुळे त्यांच्याकडे दाखवले जाणार बोट आम्ही सर्व मिळून तोडून टाकू किंवा कापून टाकू.

वाद वाढल्यानंतर मागितली माफी
- वाद वाढल्यानंतर नित्यानंद राय म्हणाले, मी म्हणीचा वापर केला होता. मी दुःख व्यक्त करतो आणि माझे वक्तव्य मागे घेतो. 
- नित्यानंद राय समस्तीपूर जिल्ह्यातील उजियारपूरचे खासदार आहेत. त्यांना 2016 मध्ये बिहार भाजपचे अध्यक्ष बनवले गेले होते. राय यादव कम्युनिटीचे आहेत. ही वोट बँक सांभाळण्यासाठी भाजपने त्यांना मैदानात उतरवले होते.

Post a Comment

 
Top