न्युयॉर्क-अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क शहरात लोअर मॅनहॅटनमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरजवळ एका भरधाव ट्रकने पादचा-यांना चिरडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण गंभीर जखमी झाले आहे. न्यूयॉर्कचे महापौर बिल दे ब्लाजियो यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले आहे.
अचानक फुटपाथ, सायकल लेनवर घुसवला ट्रक
- हल्लेखोराने जाणुनबुजुन फुटपाथ आणि सायकल लेनवर भरधाव ट्रक घातली व तेथील सायकलस्वारांना जोरदार धडक दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
- हल्लेखोराने जाणुनबुजुन फुटपाथ आणि सायकल लेनवर भरधाव ट्रक घातली व तेथील सायकलस्वारांना जोरदार धडक दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
- लोकांना चिरडल्यानंतर ट्रकमधून उडी मारुन हल्लेखाराने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याच्या पोटात गोळी झाडून त्याला अटक केली. त्यावेळी त्याच्याकडून दोन बनावटी बंदुकाही हस्तगत करण्यात आल्या.
- सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, हल्लेखोर 29 वर्षाचा आहे. त्याचे नाव सेफुल्लो सायपोव्ह आहे. तो मूळचा उझबेकिस्तानचा असून 2010पासून अमेरिकेत राहत आहे.
- अमेरिकेत आल्यानंतर फ्लोरिडामधून वाहन चालवण्यासाठी त्याने आवश्यक परवाना मिळवला होता. न्यू जर्सी येथे तो वास्तव्यास होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
- या अगोदर फ्रान्स आणि जर्मनीमध्ये दहशतवादी संघटना आयएसआयएसने असाच हल्ला घडवून आणला होता. या हल्यामागे कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आजारी माणसाने केलेला भ्याड हल्ला- ट्रम्प
या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ट्वीट केले आहे की, आजारी आणि धोकादायक व्यक्तीने केलेला हा एक भ्याड हल्ला आहे.
न्यूयॉर्कवासियांनी संयम बाळगावा
- न्यूयॉर्कचे महापौर बिल दे ब्लाजियो यांनी देखील हा भ्याड हल्ला असल्याचे म्हटले आहे.
- ते म्हणाले, आमचा संयम सुटावा म्हणून असे हल्ले केले जातात याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. मात्र न्यूयॉर्कचे नागरिक खंबीर आहेत ते आपला संयम सुटू देणार नाही.

Post a Comment