
औरंगाबाद- दोन वर्षांपूर्वी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबादेतील प्रमुख रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यासाठी ७८९ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. त्याच्या प्रकल्प अहवालांनाच (डीपीआर) अजून मान्यता मिळालेली नसताना आता नव्याने पुन्हा गडकरींनी औरंगाबादसाठी ७६ कोटी रुपये देण्याचा “शब्द’ सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना दिला आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठांना विचारले असता प्रत्यक्षात मार्चपर्यंत ही कामे सुरू होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
काही दिवसांपूर्वीच गडकरी औरंगाबादेत आले होते. त्या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार प्रशांत बंब, अतुल सावे यांनी राष्ट्रीय महामार्गासाठी अधिसूचित रस्त्यांची कामे तत्काळ करण्याची मागणी केली होती. खड्डेमुक्त रस्ते अभियानाचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील बुधवारी औरंगाबादेत आले होते. या दौऱ्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गासाठी अधिसूचित रस्त्यांपैकी उर्वरित.पान८
या रस्त्यांसाठी निधी
- एएस क्लब -लासूर स्टेशन-वैजापूर-शिर्डी
- वाळूज लिंक रोड (कांचनवाडीतून वाळूजकडे जाणारा)
- महावीर चौक- विमानतळ
- महावीर चौक- हर्सूल टी पॉइंट
- औरंगाबाद- शिऊर बंगला, येवला
Post a Comment