0

धनादेश वटल्यामुळे ‘शारदा’च्या चार संचालक, अधिकाऱ्यास 6 महिने साधी कैद

सोलापूर- अक्कलकोट रोड येथील शारदा यंत्रमाग विणकर सहकारी लिमिटेडने तीन व्यापाऱ्यांकडून सूत खरेदी केले. त्याबदल्यात धनादेश दिलेले वटले नाहीत. याप्रकरणी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्टनुसार दाखल झालेल्या खटल्यात चार संचालक आणि विक्री विभाग प्रमुखास न्यायालयाने सहा महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली. दोन फिर्यादींना प्रत्येकी सहा लाख तर एका फिर्यादीस सात लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेशही दिले. यल्लादास लछमापुरे, प्रशांत पल्ली, गोवर्धन यन्नम, अशोक येमूल, अंबादास वासाल यांना शिक्षा झाली तर ११ संचालकांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सुनावणी सुरू असताना अन्य दोन संचालकांचे निधन झाले होते.

तृषिता यार्नसचे विनायक नरसय्या राचर्ला, श्री टेडर्सचे देविदास अंबादास कुरापाटी आणि गिरीधर यार्नसच्या श्रीनिवास अंबाजी गोने या तिघांकडून सूत गिरणीने २००८ मध्ये कापूस खरेदी केली. बिलापोटी या तिघांना धनादेश दिला. कुरापाटी यांना लाख १० हजार ३१९ रुपये, गोने यांना लाख १७ हजार, ३३६ रुपये, राचर्ला यांना लाख ८९ हजार ६३७ रुपयांचा धनादेश दिला होता. व्यापारी सहकारी बॅँकेचे हे तिन्ही चेक वटले नाहीत.

तिघांनी वकिलामार्फत सूत मिलला नोटीस दिली. तेव्हा मिलच्या संचालकांनी आम्ही या तिन्ही सूत व्यापाऱ्यांचे काहीही देणे लागत नाही, असे उत्तर दिले. तिन्ही फिर्यादींनी मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांकडे फिर्याद दाखल केली. यानंतर या प्रकरणाचा युक्तिवाद झाला, सर्व कागदपत्रांची तपासणी झाली. प्रथमवर्गन्यायदंडाधिकारी पंकज बिदादा यांनी या प्रकरणाचा निकाल दिला.
याप्रकरणात १९ संचालक होते. यापैकी केशव अंकम आणि मल्लिकार्जुन येमूल या दोघांचा मृत्यू झाला. स्वाक्षरीचे अधिकारी आणि जबाबदार व्यक्ती म्हणून चार संचालक आणि एक अधिकारी यांना जबाबदार धरण्यात आले. उर्वरित संचालकांना निर्दोष सोडण्यात आले. यामध्ये न्यायालयाने शारदा यंत्रमाग सहकारी सूत गिरणी, यल्लादास व्यंकप्पा लछमापुरे, प्रशांत अनिल पल्ली, गोवर्धन शंकरय्या यन्नम, अशोक पांडुरंग येमूल (संचालक), अंबादास राजेशम वासाल (विक्री विभाग प्रमुख) यांना नोव्हेंबर २०१७ रोजी सहा महिन्याची शिक्षा सुनावली. तसेच कुरापाटी यांना लाख, गोने यांना लाख, रार्चला यांना लाख रुपये नुकसानभरपाईपोटी एक महिन्याच्या आत देण्याचे आदेश दिले. याप्रकरणी संचालकाकडून अॅड. किरण वळसंगकर, अॅड. एल. व्ही. काटकर, अॅड. जे. एम. कस्तुरे यांनी तर तिन्ही फिर्यादीकडून अॅड. सिद्धेश्वर बुगडे यांनी काम पाहिले. 

Post a Comment

 
Top