
नवी दिल्ली: जर तुम्ही अजूनही तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केला नसेल, तर तो तातडीने करुन घ्या. अन्यथा तुमची मोबाईल सेवा बंद होऊ शकते.
मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करण्यासाठी 6 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने तसं प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात दाखल केलं.
सर्व मोबाईलनंबर ई-केवायसी व्हेरिफिकेशन अंतर्गत आधार कार्डशी लिंक करणं आवश्यक आहे. इतकंच नाही तर नवीन बँक खातं काढण्यासाठीही यापुढेही आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे, असं सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करण्यास विरोध करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावरुन सुप्रीम कोर्टाने सरकार आणि मोबाईल कंपन्यांना नोटीस पाठवली होती.
Post a Comment