
नवी दिल्ली -भारत-चीन सीमेवरील तिबेटच्या निंगजीमध्ये भारतीय वेळेनुसार शुक्रवारी सकाळी 4.04 वाजता 6.9 तीव्रतेचा भूकंप आला. चीनच्या सरकारी न्यूज एजन्सी शिन्हुआनुसार, याचे केंद्र जमिनीपासून 10 किमी खोल होते. हा परिसर अरुणाचल प्रदेशच्या सीमेला लागून आहे. याची तीव्रता 6.4 होती. तथापि, यामुळे अजून कोणतीही जीवित वा वित्तहानीची पुष्टी झालेली नाही. सकाळी 6 वाजता दुसऱ्यांदा धक्के जाणवले. त्यांची तीव्रता 5 होती. याचे केंद्र जमिनीपासून 6 किमी खोलीवर होते.
Post a Comment