

कोलकातामध्ये एक चकित करणारी घटना समोर आली आहे. येथील डॉक्टरांनी एका व्यक्तीच्या पोटातून लोखंडाचे 600 खिळे बाहेर काढले आहेत. प्रदीपकुमार दाही नामक या व्यक्तीच्या पोटात खूप त्रास सुरु झाल्यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले. डॉक्टरांनी सोनोग्राफी केल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
प्रदीपने गिळले होते 600 खिळे
डॉक्टरांनी सांगितले की, प्रदीपला खिळे खाण्याची सवय होती. प्रदीप एवढे खिळे खात होता की, त्याच्या पोटात याचा ढीग साचला होता. चकित करणारी गोष्ट म्हणजे एवढे खिळे खाऊन प्रदीपच्या पोटात किंवा इतर कोणत्या अवयवाला काहीही इजा झालेली नाही.
डॉक्टरांनी चुंबकाने काढले खिळे
- Calcutta Medical College चे डॉक्टर डॉक्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटात खूप वेदना सुरु झाल्यानंतर प्रदीपला येथे अॅडमिट करण्यात आले. त्यानंतर चुंबकाने खिळे काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
- यासाठी आम्ही प्रदीपचे थोडेसे पोट कापले आणि हलक्या चुंबकाच्या मदतीने हळू-हळू खिळे बाहेर काढले.
Post a Comment