0
पुण्यात 6 ते 7 दुचाकी गाड्या जळाल्या

पुणे, 03 नोव्हेंबर:  पुण्यातील टिळक रस्त्यावर महाराष्ट्र मंडळ समोरच्या गल्लीत मध्यरात्रीनंतर 6 ते 7 दुचाकी वाहने जळून खाक झाल्या आहेत. गेल्या काही काळात अशा घटनांचे प्रमाण वाढलंय.
काल रात्री या  वाहनांना आग लागली. पण ही आग का लागली हे अजून स्पष्ट झालेले नाही.  तसंच या आगींमागे कोण आहे हे ही कळलं  नाही आहे.दुचाकी वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याच्या किंवा आगी लावण्याच्या घटना मात्र पुणे, पिंपरी परिसरात वारंवार घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी अशीच एक घटना पर्वती परिसरात घडली होती.सतत घडणाऱ्या या घटनांमुळे पुण्यात संशयाचे वातावरण निर्माण होतं आहे.

Post a Comment

 
Top