0
सोलापुरातील वैरागच्या 5 जणांचा कर्नाटकात क्रूझर-टँकरच्या अपघातात मृत्यू; 3 जण जखमी

सोलापूर-कर्नाटक येथे अपघातात सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. कलबुर्गी-हुमानाबाद महामार्गावर औराद गावाजवळ हा अपघात झाला आहे. कर्नाटकात लग्न समारंभासाठी जात असताना विवाहाच्या वाहनाला अपघात झाला.
क्रूझर आणि टँकरची समोरासमोर धडक होऊन यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत पावलेले सोलापूर जिल्ह्यातील वैरागचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातातील तिघा जखमींना कलबुर्गी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उज्वल (12), सोमनाथ (30) आणि वीरभद्र (60) हे मृत व्यक्तींची नावे आहेत तर अन्य दोघांची नावे समजलेली नाहीत.

Post a Comment

 
Top