0
बिहारमध्ये दोन दुर्घटना; नदीत बुडून 5 मुलांसह 12 जणांचा मृत्यू; दुसरी दुर्घटना बागमती नदीत

पाटणा-बिहारमध्ये दोन दुर्घटनांमध्ये नदीत बुडाल्याने १२ जणांचा मृत्यू झाला. त्यात पाच मुलांचाही समावेश आहे. तीन मुलांना वाचवण्यात यश मिळाले. तीन जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. संध्याकाळी सात वाजता अंधार पडल्याने बचाव कार्य थांबवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली दुर्घटना वैशाली जिल्ह्यात घडली. रविवारी गंगा नदीच्या फातुहा घाटावर अनेक लोक सहलीसाठी आले होते. त्या वेळी स्नान करताना १२ जणांचा बुडून मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सायंकाळी उशिरापर्यंत नऊ मृतदेह बाहेर काढण्यात आले. इतर दोघे जण अजूनही बेपत्ता आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी नालंदा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहेत. दोन मुलांना बेशुद्धावस्थेत सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुसरी दुर्घटना बागमती नदीत
दुसरी दुर्घटना समस्तीपूर जिल्ह्यातील बागमती नदीवर झाली. १२ लोक छोट्या नावेतून नदी ओलांडत होते. तेव्हा नाव उलटली. काही लोक पोहत बाहेर आले. पाच जणांना वाचवण्यात आले. स्थानिक नागरिकांनी तीन महिलांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. त्या २० ते ३० वयोगटातील आहेत. या नावांमधून दररोज पशूंसाठी चारा आणला जात होता.

Post a Comment

 
Top