0
auto n car accident india साठी इमेज परिणाम
कोल्हापूर-सदर बाजारमधील कोरगावकर नगर इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या रिक्षाला (एमएच 09 CW 294) भरधाव कारने (एमएच 09 DM 4488) पाठीमागून आलेल्या जोरदार धडक दिली. रिक्षा जागेवर पलटी झाली. या रिक्षात एकूण आठ विद्यार्थी होते. त्यापैकी चार विद्यार्थी आणि रिक्षाचालक जखमी झाला आहे. जखमींना कदमवाडी येथील डॉ.डीवाय पाटील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कारचालकाला बेदम चोपले...
दरम्यान, कार चालकाला विद्यार्थ्यांच्या पालकांसह तेथे जमलेल्या नागरिकांनी बेदम चोप दिला. त्याच्या कारचीही तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शाहूपुरी पोलिसांनी धाव घेत वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिसात झाली आहे.
विद्या मनीष कुचकोरवी, विनायक मनीष कुचकोरवी, सई वसंत तमरगे, निशिकांत परशुराम कुचकोरवी आणि रिक्षाचालक सागर एकनाथ बाबर (वय 28, रा.कदमवाडी) अशी जखमींची नावे आहेत.

Post a Comment

 
Top