
पुणे-पुरंदर तालुक्याच्या तहसीलदारांशी अाेळखीचा बहाणा करुन सातबारा उताऱ्यावर दाखल असलेले कुळ रद्द करून देण्यासाठी अाठ लाख रुपयांची लाच एका शेतकऱ्याने मागितली हाेती. यापैकी चार लाखांचा हप्ता स्वीकारत असताना एसीबीने सापळा रचून रामदासअप्पा खैरे (४५, रा. नाझरकप्पा खैरेवाडी, ता. पुरंदरे) यास अटक केली.
याप्रकरणी एसीबीकडे एका व्यक्तीने तक्रार दाखल केली अाहे. संबंधित तक्रारदाराने खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर साधे कुळ अशी नाेंद अाहे. सदरचे कुळ रद्द करण्यासाठी मूळ मालक व इतर ११ जणांविरोधात ७० ब प्रमाणे तहसील कार्यालयात त्यांनी दावा दाखल केला हाेता. सदरच्या दाव्यात तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी रामदास खैरे याने तक्रारदाराशी संपर्क साधून अापली पुरंदर तहसीलदारांसोबत अाेळख अाहे. तसेच ७० ब चा निकाल हा तक्रारदारच्या बाजूने करून देण्यासाठी अाठ लाख रुपयांची मागणी केली. सदर रकमेपैकी चार लाख रुपये घेताना पुणे-सासवड रस्त्यावरील हाॅटेल अानंद या ठिकाणी खैरेस अटक करण्यात आली.
Post a Comment