0
यमुना एक्सप्रेस-वे वर उलटली शालेय सहलीची बस; एक ठार, 45 जखमी, टायर फुटल्याने अपघात

आग्रा -यमुना एक्सप्रेस वेवर शुक्रवारी हिमाचल प्रदेशातून ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या शालेय विद्यार्थ्यांची बस उलटली. त्यात एक विद्यार्थी ठार झाला आहे. तर अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. बसचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

अपघातात 18 विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जखमी मुलांवर सध्या उपचार सुरू आहेत.

रक्ताच्या थारोळ्यात पडले होते विद्यार्थी..
- हिमाचल प्रदेशच्या अमर भारती साळेतील विद्यार्थी ताजमहाल पाहण्यासाठी आग्रा येथे जात होते. त्यांची बस यमुना एक्सप्रेस वे मार्गे येत होती. 
- खंदौलीजवळ अचानक बसचे समोरचे टायर फुटले आणि चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली. 
- अपघातामुळे एकच गोंधळ उडाला लोकांनील लगेचच मदत करायला सुरुवात केली. मुले जोरजोरात ओरडत होती, त्यामुळे अत्यंत हृदयद्रावक परिस्थिती निर्माण झाली. 
- स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बस उलटताच एकच आरडा-ओरडा सुरू झाला होता. 
- लोक जेव्हा पोहोचले, तेव्हा अत्यंत विदारक स्थिती पाहायला मिळाली. मुले रक्तांच्या थारोळ्यात पडलेले होते.
- पोलिसांनी बचावकार्यात स्थानिकांची मदत केली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. 
- पोलिसांनी फायर ब्रिगेडलाही बोलावले. क्रेनच्या मदतीने बस हटवण्यात आली. 
- एत्मादपूरमध्येही काही जखमींवर उपचार सुरू आहे.


Post a Comment

 
Top