
मुंबई- गुजरात विधानसभा निवडणूक लढणार नाही, या भूमिकेवर ठाम असलेल्या शिवसेनेने अचानक यू-टर्न घेतला आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये शिवसेनेने 40 जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेना गुजरातमध्ये निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी करत आहे. याबाबत शिवसेना खासदार अनिल देसाई अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. शिवसेनेच्या या राजकीय खेळीमुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
भाजपला फटका बसणार?
- गुजरातमध्ये काँग्रेसच्या आव्हानामुळे हैराण झालेल्या भाजपसमोर आता शिवसेनेचे आव्हान उभे ठाकले आहे.
- भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये शिवसेनेने ४० जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या राजकीय खेळीमुळे हिंदूत्ववादी मतांमध्ये फूट पडून गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला फटका बसण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
Post a Comment