0
इंडियन बॉलरची धमाल: 4 मेडन ओव्हर टाकून अख्ख्या टीमला केले बाद, त्यात घेतली 1 हॅट्रिक


स्पोर्ट्स डेस्क -राजस्थानचा राइट आर्म फास्ट बॉलर आकाश चौधरीने जयपूरमध्ये झालेल्या टी-20 मध्ये अशी कमाल दाखवली की सगळेच अवाक झाले. पठ्ठ्याने 4 ओव्हर मेडन टाकल्या. एकही धाव काढून न देता त्याने यात सर्व 10 गडी बाद केले. त्यामध्ये एका हॅट्रिकचा देखील समावेश आहे. त्याचे वय केवळ 15 वर्षे आहे. सर्व 10 विकेट घेण्याचे विक्रम यापूर्वीही झाले आहेत. मात्र, एकही धाव काढू न देता अख्ख्या टीमला बाद करण्याची ही पहिलीच वेळ आहे. दुर्दैवाने, ही टूर्नामेंट अधिकृत नसल्याने आकाशच्या रेकॉर्डची क्रिकेटमध्ये दखल घेतली जाणार नाही.

Post a Comment

 
Top