0
पंचकुलामध्ये 3 चिमुरड्यांची हत्या, वडिलांच्या सांगण्यावरून काकाने मारल्या गोळ्या

कुरुक्षेत्र - पंचकुलाच्या जंगलात मंगळवारी पोलिसांना तीन चिमुरड्यांचे मृतदेह आढळले. या तिन्ही मुलांची हत्या गोळी घालून करण्यात आली होती. तपासानंतर पोलिसांनी या मुलांचे वडील आणि काका यांना अटक केली आहे. पोलिसांच्या मते वडिलांच्या सांगण्यावरूनच काकाने या तिन्ही मुलांची गोळ्या घालून हत्या केली. मुलांच्या वडिलाचे दुसऱ्या महिलेबरोबर संबंध होते. त्यातूनह ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती तिन्ही मुले
- कुरुक्षेत्रचे एसपी अभिषेक गर्ग यांच्या मते, तीन मुले 19 नोव्हेंबरला घरातून बेपत्ता झाले होते. पोलिसांनी याबाबत त्यांचे वडील आणि काकाकडे चौकशी केली आणि नंतर संशयाच्या आधारे त्यांना अटक करण्यात आली. 
- चौकशीमध्ये आरोपींनी सांगितले की, तिन्ही मुलांचे मृतदेह जंगलामध्ये फेकले आहेत. पोलिसांना ते मृतदेह मिळाले आहेत.

4, 8 आणि 11 वर्षे होते वय..
- हत्या करण्यात आलेल्या मुलांचे वय 4 ते 11 वर्षांदरम्यान होते. त्यात समीर (11), सिमरन (8) आणि समर (4) यांचा समावेश आहे.

हे होते कारण..
- पोलिस अधिक्षकांच्या मते, हत्या घडवून आणणारा आरोपी म्हणजे मुलांचा पिता फोटोग्राफर होता. त्याचे एका महिलेशी संबंध निर्माण झाले होते. त्यातूनच ही हत्या करण्यात आली. 
- रविवारी 19 नोव्हेंबरला तीन मुले दुपारी बेपत्ता झाली. कुटुंबीयांना वाटले की, शेजारी खेळायला गेले असतील. पण सायंकाळ झाली तरी ते परत आले नाही, तेव्हा त्यांचा शोध घ्यायला सुरुवात झाली. 
- नंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींची चौकशी करत त्यांना अटक केली.

Post a Comment

 
Top