
पुणे- नागपूरपाठोपाठ पुण्यातही प्राप्तीकर विभागाने (आयटी) डब्बा ट्रेडिंगचा पर्दाफाश केला आहे. प्राप्तीकर विभागाने केलेल्या छापेमारीत अंदाजे 30 कोटी रूपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती अशी की. डब्बा ट्रेडिंगचा मुख्य प्रवर्तक अशोक जैन व एजंट ललित ओसवाल यांना याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. पुण्यातील मार्केटयार्ड जवळील प्रेमनगर व भवानी पेठेत प्राप्तीकर विभागाने छापेमारी केली. या छापेमारीत दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या 3 कोटी रूपये रक्कमेच्या नोटा, 3 कोटी रूपये किंमतीचे सोने आणि 30 कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
अशोक जैनकडे केलेल्या छापेमारीत डब्बा ट्रेडिंगच्या ग्राहकांची माहिती असलेली डेटाबेस असलेल्या 15 हार्डडिस्क, 15 पेनड्राईव्ह आणि 100 मोबाईल जप्त करण्यात आल्याचे कळते आहे.
Post a Comment