
मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकावर रुग्णवाहिका असणं बंधनकारक आहे. मात्र, अजूनही 30 रेल्वे स्थानकांबाहेर रुग्णवाहिका नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.
खरे पाहता एलिफिस्टन दुर्घटनेनंतर प्रत्येक रेल्वे स्थानकाबाहेर रुग्णवाहिका असणं गरजेचं आहे. मात्र, महत्वाच्या रेल्वे स्थानाकांबाहेरच रुग्णवाहिका आहेत.
अशा वेळी आपातकालीन स्थितीत प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते. दररोज लाखो रेल्वे प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. अशा स्थितीत प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न एेरणीवर आला आहे.
Post a Comment