0
पुण्यात डब्बा ट्रेडिंगचे रॅकेट; 30 काेटींची मालमत्ता जप्त; अायकर विभागाची कारवाई

पुणे-पुण्यातील भवानी पेठ व मार्केटयार्ड परिसरातील प्रेमनगर याठिकाणी अायकर विभागाने बुधवारी छापे टाकून डब्बा ट्रेडिंग व्यवहाराचे रॅकेट उघडकीस अाणले अाहे. याप्रकरणी सुमारे ३० काेटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उजेडात अाली. या बेकायदा व्यवहारातील सूत्रधार अशाेक जैन व एजंट ललित अाेसवाल यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चाैकशी करण्यात येत अाहे.

या छाप्यात अायकर विभागाने तीन काेटी रुपये किमतीचे साेने, तीन काेटी रुपयांची राेख रक्कम, शंभर माेबाइल फाेन, १५ हार्डडिस्क, १५ पेनड्राइव्ह व इतर अशी सुमारे ३० काेटींची बेहिशाेबी मालमत्ता जप्त केली अाहे. डब्बा ट्रेडिंग हा शेअरिंग मार्केटसारखा प्रकार अाहे. बाजारभावाच्या प्रचलित नियमांना बगल देत डब्बा ट्रेडर हे व्यवहार करतात. हा प्रकार पूर्वी नागपुरातही उघडकीस अाला हाेत. डब्बा ट्रेड मध्ये व्यवहाराच्या नाेंदी केवळ वहीत नाेंदविलेल्या असतात.
फाॅरवर्ड काॅन्ट्रक्टस (रेग्युलेशन) अॅक्टनुसार असे व्यवहार बेकादेशीर ठरतात. मागील पाच वर्षांपासून अशाेक जैन हे त्यांचा ब्राेकर ललित अाेसवाल याच्या मदतीने हे व्यवहार करत असल्याची माहिती अायकर विभागास प्राप्त झाली. त्यावरून अायकर विभागाने छापा टाकून हे रॅकेट उघडकीस अाणले. डब्बा ट्रेडिंग रॅकेटचे धागेदाेरे महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात या तीन राज्यापर्यंत पाेहाेचलेले अाहेत. हे व्यवहार माेबाइलच्या माध्यमातून माेठ्या प्रमाणात चालतात.
भिशीवर ट्रेडिंग
ताब्यात घेतलेले संशयित अशोक जैन आणि ब्रोकर ललित जैन हे सन २०१२ पासून डब्बा ट्रेडिंग करत आहे. त्यांच्या सोबत प्रफुल्ल संघवी हा व्यापारी भिशीवर ट्रेडिंग करत असे, तर देवेंद्र संघवी हा व्यापारी क्रिकेटवर बेटिंग घेत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. भंडारी नावाचा व्यापारीही हॉर्स रायडिंगवर बेटिंग घेत होता. मल्टी एक्स्चेंज कमोडिटीच्या माध्यमातून व्यापारी डब्बा ट्रेडिंगचा राेखीने बेकायदा व्यवहार करत होते.

Post a Comment

 
Top