0



रोम - इटली येथील एका एचआयव्ही पॉझिटीव्ह व्यक्तीने मुद्दाम 30 महिलांना HIVचे शिकार केले. यामध्ये 14 वर्षीय मुलीचाही समावेश आहे. या प्रकरणी या व्यक्तीला 24 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कोर्टामध्ये प्रकरण सुरु असतांना अनेक महिला आणि तरुणींची उपस्थिती होती. हा व्यक्ती या तरुणी आणि महिलांना सोशल माध्यम आणि इंटरनेट डेटिंग साईटद्वारे आपल्या जाळ्यात ओढायचा. 53 महिलांशी ठेवले शारिरीक संबंध...
- 33 वर्षे वयाचा अकाऊंटंट वैलेंटीनो तल्लुटोने 2006 पासून ते कैद होईपर्यंत 2015पर्यंत तब्बल 53 महिलांसोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले होते. यापैकी 30 महिलांना HIVची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. 
- HIVचे शिकार झालेल्यांमध्ये 14 वर्षाच्या मुलीपासून ते 40 वर्षाच्या महिलांचाही समावेश आहे. यापैकी तीन महिलांचे पुरुष पार्टनर आणि एका महिलेच्या मुलालाही HIVची लागण झाली. 
- रोमच्या रेबिबिया तुरुंगात या प्रकरणाची ट्रायल मार्चपासून सुरु होती. यादरम्यान पीडित महिलांनी सांगितले की, वैलेंटीनोने प्रेमाच्या जाळ्यात ओढून HIVचे भक्ष्य बनविले.
- वैलेंटीनो एकाचवेळी सहा महिलांशी संबंध प्रस्थापित करत असे. यामध्ये अनेक लग्न झालेल्या महिलांसह महाविद्यालयीन तरुणींचाही समावेश होता.
- एका पीडितेने सांगितले की, एकदा वैलेंटीनोला कंडोम वापरण्यास सांगितले होते. मात्र अॅलर्जीचे कारण पुढे करून कंडोम वापरण्यास नकार दिला होता. नुकतेच या महिलेने HIV तपासणी करून घेतली. 
- काही पीडित महिलांनी स्वत: HIVची लागण झाल्याची माहिती वैलेंटीनोला दिली. मात्र त्याने स्वत:ला एचआयव्ही असल्यास नकार दिला. 
- कोर्टात वैलेंटीनोच्या वकिलांनी सांगितले की, वैलेंटीनोने ही चुक नक्कीच केली आहे. मात्र ही चुकी जाणूनबुझून केलेली नाही.
- वैलेंटीनोला शिक्षा सुनावण्यात आली, तेव्हा त्याला त्याच्याच कृत्याचा पश्चाताप झाल्याचे मान्य केले. त्याचे परिणाम काय होतील, याचा विचार कधीही केला नसल्याचे त्याने सांगितले.

Post a Comment

 
Top