0
मुंबई: कुर्ल्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 3 तरूणींची सुटका तर 2 महिलांना अटक

मुंबई- मुंबईतील कुर्ला भागातील एका बंगल्यात छापा मारत मुंबई पोलिसांनी एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या छाप्यात तीन तरूणींची सुटका करण्यात आली आहे. तर सेक्स रॅकेट चालविणा-या दोन महिला दलालांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी जेव्हा छापा टाकला तेव्हा तरूणी ग्राहकांसोबत आपत्तीजनक स्थितीत होत्या. दोन वर्षापासून सुरू होते सेक्स रॅकेट...
- या प्रकरणाचा तपास करणारे डीसीपी शहाजी उमप यांनी सांगितले की, कुर्ल्यातील नेहरुनगर भागातील कामगारनगर येथे एक रो हाऊस प्रकारातील बंगल्यात मागील दोन वर्षापासून काही महिला सेक्स रॅकेट ऑपरेट करत होत्या.
- स्थानिक लोकांनी याबाबत पोलिसांना अनेकदा तक्रार केली होती. आताही ताज्या तक्ररीनंतर, मंगळवारी रात्री पोलिसांच्या टीमने छापा मारत तीन तरूणींना वेश्याव्यवसायाच्या जाळ्यातून सोडवले.
- डीसीपी शहाजी उमप यांनी सांगितले की, या रॅकेटची मुख्य सूत्रधार एक महिला होती तर तिच्या मदतीला असलेल्या आणखी एका महिला एजंटला एटक केली आहे. रेखा मोरे आणि अनिता चांदणे अशी त्यांची नावे आहेत. 
- पोलिसांनी जेव्हा या बंगल्यात रेड मारली तेव्हा महिला आपत्तीजनक स्थितीत 2 ग्राहकांसोबत होत्या. पोलिसांना पाहताच तेथील दोन्ही ग्राहक तेथून फरार झाले. त्यांचा तपास सुरू आहे. 
- पोलिसांना तपासात आढळून आले की, या बंगल्यात नेहमीच हाय प्रोफाईल लोक मोठ-मोठ्या गाड्यात येतात. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Post a Comment

 
Top