0
यमुना एक्सप्रेस-वेवर एकापाठोपाठ एकमेकांवर आदळल्या गाड्या, पाहा LIVE अॅक्सिडेंट
आग्रा - यमुना एक्सप्रेस-वे वर बुधवारी धुक्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे 25 हून अधिक गाड्या एकमेकांवर आदळल्या. घटनेनंतर एक व्हिडिओ समोर आला आहे, तो सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लोक कारमधून बाहेर येण्याआधीच एकमेकांवर गाड्या आदळत असल्याचे दिसत आहे.

वेहवेगळ्या ठिकाणी झाले अपघात.. 
- पहिली घटना यमुना एक्सप्रेस-वेच्या माइल स्टोन 125 जवळ घडली. येथे धुक्यामुळे सुमारे 15 ते 20 गाड्या एकमेकांवर आदळल्या. 
- पोलिसांनी खबरदारी म्हणून आग्रा येथील खंदौली आणि नोएडाकडे जाणाऱ्या गाड्या अडवल्या आहेत. अपघातानंतर क्रेनचा वापर करून गाड्या हटवण्यात आल्या. 
- दुसरा अपघात कोटवनच्या जवळ घडला. याठिकाणी सुमारे 6 गाड्या एकमेकांना धडकल्या. 
- नोएडाच्या दनकौरजवळ यमुना एक्सप्रेस वेवरही सुमारे 10 गाड्या एकमेकांवर आदळल्या. 
- अपघातात एका विदेशी महिलेचाही मृत्यू झाला.

Post a Comment

 
Top