0
मृत मुलाच्या अंत्यसंस्कारासाठीही 'ती' हतबल, पत्नीच्या हातावर 20 रुपये ठेवून पती पसार
बीड - प्रसूतीनंतर हातावर वीस रुपये ठेवून गेलेला पती महिना झाला तरी आलाच नाही. जिल्हा रुग्णालयाने माणुसकीने तिला तात्पुरता आसरा दिला. मात्र महिन्याच्या बाळाचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. ना नातेवाईक, ना पती चिमुकल्याच्या अंत्यसंस्कारासाठीही ती हतबल झाली. सामाजिक कार्यकर्त्यांनीच त्या बालकावर अंत्यसंस्कार केले.
रागिणी (नाव बदलले आहे) गेवराई तालुक्यातील रहिवासी. पती आणि ती दोघेही एचआयव्ही बाधित असल्याचे ती सांगते. याच कारणामुळे नातेवाइकांनीही घराबाहेर काढून या दांपत्याशी संबंध तोडले. गावातच किरायाने ते राहतात. प्रसूतीसाठी महिन्यापूर्वी जिल्हा रुग्णालयात तिला पतीने दाखल केले. मुलगा झाला म्हणून दोघांनाही आनंद झाला. पण तोही एचअायव्ही बाधित असल्याचे कळाले. हा आनंद क्षणभंगूर ठरला. रागिणी म्हणते, घरी आम्ही दोघेच. त्यामुळे बाळंतपण कोण करणार म्हणून मी काहीतरी व्यवस्था करून येतो म्हणून ते गेले. हातावर २० रुपये ठेवले. पण महिना झाला अजून आलेच नाहीत. मी त्यांची वाट पाहते आहे.
...अन् अास सोडली
रुग्णालयातूनगेल्यावर दोन तीन दिवस पती आल्याने मी फोन करण्याचा प्रयत्न केला. तर तो बंदच आहे. त्यांच्या काही नातेवाइकांना विचारले तर त्यांनी तुम्ही आमचे कुणीच नाही. परत फोन करू नका म्हणून झिडकारले. महिना झाला त्यांचीच वाट पाहतेय. तेही आजारी होते. ते या जगात राहिले की नाही हीच शंका असल्याचे सांगताना रागिणी स्तब्ध होते.
बालकाचा मृत्यू
महिलेलापती सोडून गेल्यापासून महिनाभरात बालकाचीही तब्येत बिघडली. त्याला एनआयसीयूमध्ये ठेवले. पण उपचार सुरू असताना बुधवारी त्याचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कारासाठी दमडीही नाही, कुणी ओळखीचेही नाही. थिजलेल्या डोळ्यांनी सुन्न रागिणीला तत्वशील कांबळे, दत्ता बारगजे या सामाजिक कार्यकर्त्यांनी आधार देत मुलावर इन्फंट इंडियात अंत्यसंस्कार केले.
एड्सग्रस्त महिलेला हवाय मदतीचा हात
रागिणीच्या पूनर्वसनासाठी आता मदतीच्या हातांची गरज आहे. एचआयव्ही बाधित असल्याने तिच्या समोर अनेक प्रश्न आहेत. गावी परतले तर नातेवाईक स्वीकारतील का, पतीचाही काही पत्ता नाही. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या महिलेला आधारासाठी हवाय मदतीचा हात.

Post a Comment

 
Top