0
भारत-न्यूझीलंड अाज तिसरा टी-20 सामना; चार विक्रमांवर पावसाचे सावट

तिरुवनंतपुरम - टीम इंडिया व न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक लढत अाज मंगळवारी ग्रीन फील्डच्या मैदानावर हाेईल. हा केरळात हाेणारा पहिला टी-२० सामना अाहे. २९ वर्षांनंतर तिरुवनंतपुरममध्ये क्रिकेट सामन्याचे अायाेजन करण्यात अाले आहे. दाेन्ही संघांनी प्रत्येकी एका विजयाने मालिकेत १-१ ने बराेबरी साधली अाहे.
श्रीलंकेला मागे टाकण्याची संधी
यातील विजयाने भारताच्या नावे ८८ टी-२० पैकी ५२ सामने जिंकण्याची नाेंद हाेईल. यामुळे भारतीय संघ यामध्ये श्रीलंकेला (५१ विजय) मागे टाकून तिसरे स्थान गाठेल. पाक (७२ विजय) अव्वल अाणि अाफ्रिका (५९) दुसऱ्या स्थानी अाहे.

किवींच्या पुढे पाक, अाफ्रिका
न्यूझीलंड १०० टी-२० सामने खेळणारा तिसरा संघ ठरेल. यामध्ये पाक (१२० )अव्वल व अाफ्रिका (११० ) दुसऱ्या स्थानी अाहे.

Post a Comment

 
Top