0
ती होती 2 मुलांची आई, अविवाहित तरुणावर प्रेम जडल्यावर तिने केले असे काही

पुणे- सिंहगड किल्ल्यावर 26 ते 27 वयोगटातील एका जोडप्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्या केलेली महिला ही जुळ्या मुलांची आई असून तर तिचा प्रियकर अविवाहित होता.
महिलेच्या पतीने दाखल केली होती हरवल्याची तक्रार
- पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर दुपारी साडेचार वाजता काही लोक फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांना कल्याण दरवाजा जवळ एक आत्महत्या केलेल्या जोडप्याचे मृतदेह दिसले.
- पोलिसांनी ही माहिती कळाल्यानंतर त्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमार्टमसाठी पाठवले.
सकाळी झाले होते घरातुन गायब
- आत्महत्या केलेली महिला ही दोन जुळ्या मुलांची आई असून सकाळपासूनच घरातून गायब होती.
- तिच्या पतीने ती हरवल्याची तक्रार पौड पोलिस ठाण्यात दिली होती. 
- तिच्याच गावात राहणारा शेखर हा मुलगाही गायब होता. त्याच्या भावानेही तो हरवल्याची तक्रार दिली होती.
- ते दोघेही दुचाकीवरुन सिंहगडावर गेले होते आणि त्यांनी आत्महत्या केली.

Post a Comment

 
Top