0
ऐकावे ते नवलच: मुंबई- दिल्ली विमान प्रवास भाडे यामुळे पोहचले 1 लाख रूपयांवर
  • दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एक धावपट्टी बंद असल्याने मुंबई- दिल्लीदरम्यान उड्डाण करणाऱ्या विमानांची संख्या निम्म्यावर अाली अाहे.
मुंबई- दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एक धावपट्टी बंद असल्याने व उत्तर भारतात धुक्याने थैमान घातल्याने मुंबई- दिल्लीदरम्यान उड्डाण करणाऱ्या विमानांची संख्या निम्म्यावर अाली अाहे. त्यामुळे एरवी या प्रवासासाठी अाकारले जाणारे अडीच ते तीन हजार रुपये भाडे बुधवारी चक्क ६० हजार रुपयांपर्यंत वाढले हाेते. काही व्हीआयपी लोकांनी तर तब्बल १ लाख रूपये मोजून मुंबई दिल्ली तिकीटे खरेदी केल्याचे सांगितले गेले. दरम्यान, यामुळे अनेक सर्वसामान्य प्रवाशांना विमान प्रवास रद्द करून मनस्ताप सहन करावा लागला. अचानक भाडे वाढल्याने अनेकांनी मुंबई वा वापीहून राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीला जाण्याचाच मार्ग अवलंबला आहे.
देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी दिल्लीतीलच इंदिरा गांधी अांतरराष्ट्रीय विमानतळावरील तीन धावपटट्यांपैकी एक धावपट्टी मंगळवारपासून तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई- दिल्ली मार्गावरील दरराेजच्या ३७ विमान फेऱ्यांची संख्या कमी करून ती १८ पर्यंत घटवण्यात अाली. त्यातच उत्तर भारतात धुक्याने थैमान घातल्याने विमान उ्डडाण रद्द झाली आहेत. त्यामुळे मुंबई-दिल्ली प्रवास करणाऱ्यांना मोठा फटका बसत अाहे.
एअर इंडियासह जेट आणि इंडिगो कंपनी आपली विमाने अाधी कोलकाता आणि चेन्नई येथे नेऊन नंतर प्रवाशांना दिल्लीला आणत आहे. त्यामुळे अडीच-तीन तासांच्या मुंबई-दिल्ली प्रवासाला १५ ते १६ तास विमानाने लागत आहेत. ही बाब लक्षात घेऊन नाशिकसह अनेक ठिकाणांहून दिल्लीला विमानाने जाणारे प्रवासी मुंबईला येऊन 'राजधानी'चे तत्काळमध्ये तिकीट काढून दिल्लीला जात आहेत, तर काही प्रवासी वापीला जाऊन 'राजधानी'मार्गे दिल्लीला जाण्याचा मार्ग अवलंबत आहेत.

Post a Comment

 
Top