नवी दिल्ली - गुडगावच्या एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये डेंग्यू पीडित मुलीचा (7 वर्षे) मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांनी हॉस्पिटलवर अतिरिक्त पैसे वसूल केल्याचा आरोप केला आहे. याबाबतीत आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच हॉस्पिटलकडे रिपोर्टही मागवला आहे. काही दिवसांपूर्वी एका ट्विटर यूझरने याची तक्रार आरोग्य मंत्र्यांकडे केली होती. ते ट्वीट्स व्हायरल झाले. 15 दिवस रुग्णालयात दाखल असलेल्या तरुणीच्या उपचारासाठी हॉस्पिटलने सुमारे 18 लाखांचे बिल त्यांना दिले. उपचारातही निष्काळजीपणा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 14 सप्टेंबरला चिमुरडीचा मृत्यू झाला. दुसरीकडे हॉस्पिटलने उपचारात सर्व काळजी घेतल्याचा दावा केला आहे.
नड्डांनी दिले कारवाईचे आश्वासन
माझ्या मित्राची 7 वर्षांची मुलगी डेंग्यूच्या उपचारासाठी 15 दिवस फोर्टिस हॉस्पिटलमध्ये भरती होती. हॉस्पिटलने तिच्या उपचाराचे 18 लाखांचे बिल तयार केले. त्यात 2700 हँड ग्लोज आणि 660 सिरिंजचा समावेश होता. अखेर त्या चिमुरडीचा मृत्यू झाला.
हॉस्पिटलचे स्पष्टीकरण?
- फोर्टिस हॉस्पिटलचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन हेड, अजेय महाराज यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की, मुलीच्या उपचारासाठी सर्व मेडिकल प्रोटोकॉल आणि दिशानिर्देशांचे पालन करण्यात आले. डेंग्यूने पीडित असलेल्या या चिमुरडीला गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आणले होते. नंतर तिला डेंग्यू शॉक सिंड्रोम झाला आणि पेशींची संख्या घटत गेली. 48 तास तिला व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले.
- आम्ही त्यांना हॉस्पिटलमधून जाण्याआधीच 20 पेजचे एस्टिमेटेड बिल दिले होते. त्यात लावलेले सर्व चार्जेस अगदी योग्य होते.

Post a Comment