0
rape case साठी इमेज परिणाम

अहमदनगर- पारनेर तालुक्यातील लोणी-मावळा येथील शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या तिन्ही नराधमांना जिल्हा व सत्र कोर्टाने आज (शुक्रवारी) फाशीची शिक्षा सुनावली.

लोणी- मावळा (ता. पारनेर) येथे शाळेतून परत येत असलेल्या मुलीचा पाठलाग करुन तिच्यावर अत्याचार करुन खून करणार्‍या तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात आली. शुक्रवारी सकाळी साक्षीपुरावे तपासून जिल्हा व सत्र न्यायाधीश सूवर्णा केवले यांनी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.

लोणी-मावळा निर्भयाला न्याय मिळाला. मात्र, कर्जत तालुक्यातील कोपर्डीच्या घटनेतील 'निर्भया' अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. कोपर्डी खटल्याचा येत्या 18 नोव्हेंबरला कोर्ट आपला निकाल देणार आहे. या खटल्याचा अंतिम युक्तीवाद पूर्ण झाला आहे. त्यामुळे या निकालाकडे राज्यभरातील जनतेचे लक्ष लागले आहे.

13 जुलै 2016 रोजी नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर नराधमांनी बलात्कार करुन तिची हत्या केली होती. दिल्लीतील निर्भयाप्रकरणाप्रमाणेच कोपर्डीतील घटनाही अत्यंत निर्घृण होती. अल्पवयीन मुलीवर केवळ बलात्कार करून नराधम थांबले नाहीत, तर त्यांनी तिच्या मृतदेहाचीही विटंबना केली होती.

कोपर्डी: 18 नोव्हेंबरला निकाल

बहुचर्चित कोपर्डी खटल्यातील आरोपीच्या वकिलांचा अंतिम युक्तिवाद काल (गुरुवारी) पूर्ण झाला. मुख्य आरोपीच्या वतीने विधी सेवा प्राधिकरणाने नियुक्त केलेले अॅड. योहान मकासरे दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी संतोष भवाळच्या वकिलांनी लेखी अंतिम युक्तिवादही सादर केला. युक्तिवादाचे कामकाज पूर्ण झाल्याचे नमूद करत या खटल्याच्या निकालासाठी 18 नोव्हेंबर ही तारीख न्यायालयाने जाहीर केली आहे.

आरोपी पप्पू शिंदेच्या वतीने अॅड. मकासरे यांनी युक्तिवादात दोषारोपपत्रात बहुतांश चुका आणि उणिवा असल्याचे नमूद करत पीडितेच्या मैत्रिणीच्या आईची साक्ष आतापर्यंत तपासली नसल्याचा आक्षेप नोंदवला.

Post a Comment

 
Top