0


MCOCA  against 17 accused in Kailsh Kadam case latest updates

पुणे पिंपरीतील कामगार नेते कैलाश कदम यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी एकूण 17 जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांवर मोक्का लागण्याची ही पहिलाच वेळ आहे.
कदम यांच्या हत्येचा कट रचण्याचा आरोप असणाऱ्या वकील सुशील मंचरकरसह सराईत गुन्हेगारांना या कटासाठी पळून जाण्यास मदत करणाऱ्या चार पोलिस, माजी स्वीकृत प्रभाग सदस्य हमीद शेख अशा एकूण सतरा जणांवर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पिंपरीत सप्टेंबर महिन्यात कामगार नेते कैलाश कदम यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. मात्र तो उधळून लावत पोलिसांनी राष्ट्रवादीच्या नगसेविकेचे पती अॅड. सुशील मंचरकर, राष्ट्रवादीचा माजी स्वीकृत सदस्य हमीद नवाब शेख यांच्यासह आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र आरोपींनी कोर्टातून पलायन केले त्यानंतर तपास सुरु या तपासात पोलिसांनीच आरोपीना पळून जाण्यास मदत केल्याचं निष्पन्न झाले.
कोर्टातून आरोपींनी पलायन केल्यानंतर त्यांना मदत करणाऱ्या पोलिस कर्मचारी सुभाष खाडे, विजय वाघमारे, शंकर कोकरे आणि संजय चंदनशिवे आणि इतर यांच्यावर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपींना पळून जाण्यास पोलिसांनी मदत केल्याचेही उघड झाले त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
पुणे शहरात पोलिसांवर मोक्का अंतर्गत कारवाई होण्याची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आता पोलीस पुढील तपास कशाप्रकारे करतात ते पहावं लागेल.

Post a Comment

 
Top