
औरंगाबाद- सालगड्याच्या अल्पवयीन मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर शाळेच्या व्हरंड्यात बलात्कार करणार्या नराधमाला सेशन कोर्टाने 10 वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सुनील रमेश जाधव (वय-21, रा.कसबा गल्ली, पिशोर, ता. कन्नड, ह.मु. बोदेगाव खुर्द) असे नराधमाचे नाव आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्हरंड्यात बलात्कार...
24 सप्टेंबर 2015 रोजी रात्री साडेनऊ वाजता पीडिता शौच्चासाठी बोदेगाव खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील मैदानात गेली होती. त्यावेळी सुनील याने पीडितेचा हात धरून तिला शाळेच्या व्हरंड्यात नेले व तिच्यावर बलात्कार केला. तिला व तिच्या आई-वडिलांना जिवे मारड्याची धमकी दिली.
Post a Comment