नवी दिल्ली - 8 नोव्हेंबर 2016 या दिवशी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या जनतेला संबोधित केले. नरेंद्र मोदी म्हणाले होते, "भ्रष्टाचार आणि काळ्या धनावर लगाम कसण्यासाठी आम्ही 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा आज मध्यरात्रीपासून (8 नोव्हेंबर 2016 ) लीगल टेंडर नसतील." पंतप्रधानांच्या या घोषणेने पूर्ण देशाला आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता. 8 नोव्हेंबर 2017 रोजी नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होत आहे. यादरम्यान नोटबंदीने भारतावर खूप खोलवर परिणाम केला आहे.
यामुळे आणली नोटाबंदी...
नोटबंदी घोषणा झाली आणि देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. अनेक महिने यावर चर्वितचर्वण सुरू होते. आजही हा विषय थांबलेला नाही. नोटाबंदीवर टीका होऊ लागल्यावर सरकारने यामागे अनेक कारणे सांगितली. यात काळे धन नष्ट करणे, चलनातील नकली नोटांचा खात्मा, दहशतवाद आणि नक्षली हालचालींवर अंकुश लावण्यासहित कॅशलेस इकॉनॉमीला चालना देणे आदी कारणे सांगण्यात आली.

Post a Comment