
चेन्नई/मुंबई- केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या (यूपीएससी) मुख्य परीक्षेत एक परीक्षार्थी हायटेक कॉपी करताना आढळून आला. तो ब्लूटूथच्या माध्यमातून पत्नीच्या संपर्कात होता. तिच्या मदतीने तो प्रश्नांची उत्तरे लिहित होता. धक्कादायक बाब अशी की, कॉपी करणारा दुसरा तिसरा कोणी नसून आयपीएस अधिकारी निघाला. आयएएस, आयएफएस बनण्यासाठी तो यूपीएससी परीक्षा देत होता.
420 नुसार कारवाई...
- देशभरात 24 केंद्रांवर 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर यादरम्यान सिव्हिल सर्व्हिसेस 2017 ची मुख्य परीक्षा घेण्यात येत आहे.
- चेन्नईतील एग्मोर गव्हर्नमेंट गर्ल्स स्कूल हे यूपीएएसी परीक्षेचे केंद्र आहे.
- केंद्रात तमिळनाडुतील तिरुनेवेली जिल्ह्यातील नागजुनेरी एएसपी IPS सफीर करीम हा परीक्षा देण्यासाठी पोहोचले होते. पर्यवेक्षकाने परीक्षा देत असलेल्या सफीर यांना ब्लूटूथच्या माध्यमातून संवाद साधतांना रंगेहात पकडले.
- सफीर हा हैदराबादेत बसलेली पत्नी ज्युसीला ब्लूटूथच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तरे विचारत होता. याबाबत तत्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली.
- आरोपी सफीर करीम याच्यासह त्याची पत्नी ज्युसीला ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.
- पोलिसांनी सांगितले की, सफीर करीम याच्या विरोधात पुरावे सापडताच आयपीसी कलम 420 नुसार त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
केरळचा आहे सफीर करीम
- 2014 बॅचचा आयपीएस अधिकारी सफीर करीम हा केरळमधील कोचीचा राहाणारा आहे.
- तो सध्या तमिळनाडु कॅडरच्या पोलिस विभागात कार्यरत आहे.
- आयपीएस सफीर करीम याने इंजिनियरिंगची पदवी प्राप्त केली आहे.
Post a Comment