0
.कोर्टात नेले जात असताना हनीप्रीत


पंचकुला - राम रहिमची विश्वासू साथीदार - राजदार हनीप्रीत इन्सा 6 दिवस पोलिस कोठडीत होती. मंगळवारी तिला आणखी तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. पोलिस कोर्टात म्हणाले की ती तपासात सहकार्य करत नाही. विशेष तपास पथकाने म्हटले, 'हनीप्रीतने देशविरोधी व्हिडिओ तयार करुन तो व्हायरल केला होता. या व्हिडिओमध्ये देशविरोधी घोषणा होत्या. बाबाला शिक्षा झाली तर जगाच्या नकाशातून भारताला मिटवून टाकू.'

- एसआयटीने म्हटले, व्हिडिओ व्हायरल केल्याचे पुरावे हनीप्रीतच्या मोबाइलमध्ये आहे. हा मोबाइल सुखदीप कौरचे बिजनौरमधील नातेवाईकाच्या घरी आहे. पंचकुलामध्ये कुठे दंगल घडवून आणायची हे हनीप्रीतच्या लॅपटॉपमधील नकाशावर मार्क करण्यात आले होते. तिचा मोबाइल आणि लॅपटॉप अजून पथकाच्या ताब्यात आलेला नाही. तो मिळवायचा आहे. 
- एसआयटीने सांगितले, की मोबाइल आणि लॅपटॉप डेराच्या सिरसा येथील आश्रमात लपवून ठेवण्यात आला आहे. 
- दुसरीकडे, अद्याप फरार असलेले पवन इन्सा, आदित्य इन्सा आणि गोबीराम यांचे ठिकाणे तिला माहित आहे. तिच्या माहितीवरुनच त्यांना पकडता येईल. त्यासाठी तिला 9 दिवसांची कोठडी द्यावी.

Post a Comment

 
Top