0
पाकिस्तानने LoC जवळ खोदले 14 फुट सुरंग, स्फोटक युद्धसामुग्री आणि खाद्यपदार्थ जप्त

अरनिया (जम्मू)-काश्मीरच्या अरनिया सेक्टरमध्ये लाइन ऑफ कंट्रोल (LoC) वर 14 फूट लांब सुरूंग सापडले आहे. येथून काही शस्त्रे आणि खाण्या-पिण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. बीएसएफने सांगितले की, या सुरूंगातून घुसखोरी करून देशातील उत्सवाच्या काळात दहशतवादी कारवाया करण्याचा दहशतवाद्यांचा मनसूबा होता. परंतु, आता तो उधळून लावण्यात आला आहे. अरनिया सेक्टरमध्ये गेल्या काही दिवसांत शस्त्र संधी उल्लखनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 17 सप्टेबरला पाकिस्तान रेंजर्सने केलेल्या फायरिंगमध्ये 3 नागरिक जखमी झाले होते.

पाकिस्तानच्या बाजूने खोदले 14 फूट सुरूंग....
- जम्मू फ्रटियरचे बीएसएफ आयजी राम अवतार यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या बाजूने 14 फूट लांब सुरूंग खोदण्यात आले होते. यातून युध्दजन्य परिस्थितीत लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. अद्याप हे सुरूंग पुर्ण झाले नव्हते. विक्रम आणि पटेल पोस्टजवळ साफसफाई करताना बीएसएपच्या जवानांना हे भुयार आढळून आले होते.

शस्त्रधारी लोक राहत असल्याचे पुरावे...
- बीएसएपने सांगितले की, सुरूंगातून जप्त करण्यात आलेल्या साहित्यावरून हे सिद्ध होते की, येथे शस्त्रधारी लोक राहत होते. परंतु, ते पाकिस्तानात पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
- अरनियामध्ये पाकिस्तानाकडून होणाऱ्या शस्त्रसंधीचे उल्लघन पाहता अंतरराष्ट्रीय सीमेवर सुरूंगांचा शोध घेण्याची मोहिम राबवण्यात येत आहे.

भुयारातून मिळाले हे साहित्य...
- भुयारातून मॅग्जीन, भरलेले कारतून, एलईडी हेड लाइट्स, बॅट्री, टेक्निकल साहित्य, अनेक दिवस पुरेल एवढे खाण्या-पिण्याचे साहित्य मिळाले आहे. खाद्य पदार्थांच्या पॅकेट्सवर उर्दूतून नावे लिहिलेले आहेत.

उरीसारखा हल्ला करण्याचा मनसूबा...
- कश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये रविवारी 24 सप्टेंबरला सुरक्षा रक्षकांनी एनकाउंटरमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
- सैन्यदलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, उरी येथील कालगई परिसरात काही दहशतवादी लपले असल्याची सुचना मिळाली होती. त्यानुसार सकाळी सैन्य आणि पोलिसांनी शोधकार्य सुरू केले. याचवेळी दहशतवाद्यांनी फायरिंग सुरू केली. उत्तरादाखल सैन्याने केलेल्या फायरिंगमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यानंतर मंगळवारी काश्मिरमध्ये हजबुल मुजाहिद्दीनचा चार्ज साभाळण्यासाठी आलेल्या टॉप कमांडर अब्दुल कयूमला कंठस्नान घालण्यात आले होते.
- डायरेक्टर जनरल ऑफ पोलिस एसपी वैद्य यांनी सांगितले की, गेल्या वर्षी उरी सेक्टरमध्ये आर्मीबेस वर दहशतवाद्यांनी ज्याप्रमाणे हल्ला केला होता, तसाच सुसाइड अटॅक करण्याचा दहशतवाद्यांचा मनसूबा होता. परंतु, हा कट आता उधळून लावण्यात आला आहे.

घुसखोरीसाठी पाकिस्तानी आर्मी देते तोफांचे संरक्षण केले...
- दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानी आर्मीकडून थोफांचे संरक्षण देण्यात येत असल्याचे, भारतीय लष्कराने जूनमध्ये सांगितले होते. 
- भारतीय लष्कराचे प्रवक्ते यांनी सांगितले होते की, भारतीय सैन्याने पाकिस्तानी आर्मीचे अनेक कट उधळून लावले. पाकिस्तानी आर्मी भारतात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांनी कवर देत असून, त्यावर कडक नजर ठेवण्यात येत आहे.
- सप्टेंबरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लघन केले होते. यात एक जवान शहीद झाला होता आणि एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले होते.

Post a Comment

 
Top