0
करत होता मृत्यूचे LIVE टेलीकास्ट, अचानक पोलिस पोहचल्यावर घडले असे काही

मुंबई- नेहमी घटना घडल्यावर पोलिस पोहचतात असा आरोप अनेकदा पोलिसांवर केला जातो. पण मुंबईत याला छेद देणारी घटना घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या एका व्यक्तीपर्यंत वेळेवर पोहचत यापासून परावृत्त करण्यात पोलिस यशस्वी ठरले. आत्महत्येचा प्रयत्न करणारा हा युवक सातत्याने व्हॉट्सअपवर आपले स्टेट्स अपडेट करत होता. भांडण झाल्याने त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
पोलिसांनी असे वाचवले त्याचे प्राण
- पोलिसांनी सांगितले की, सचिन धावडे नावाच्या या युवकाला त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. तो प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. पत्नी सोडून गेल्याने तो नैराश्यवस्थेत गेला होता.
- पोलिसांना शुक्रवारी संध्याकाळी माहिती मिळाली की, साकीनाका येथील मोहाली पाईपलाइन जवळ एक युवक आपल्या घरात पंख्यात लटकून फाशी घेण्याचा प्रयत्न करत आहे.
- त्यानंतर पोलिसांचे एक पथक त्याच्या घरी पोहचले. त्यावेळी त्याच्या आई-वडिलांनी घराचा दरवाजा उघडला. ते घराच्या दुसऱ्या खोलीत सचिन आत्महत्येचा प्रयत्न करत आहे याची कल्पनाही नव्हती.
- त्यानंतर पोलिसांनी घराच्या छतावरुन या खोलीत शिरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर ते खोलीत उतरण्यात अपयशी ठरले. त्यांनी खिडकीतून पाहिले असता तो पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्यांना दिसला पण त्यावेळी त्याचा श्वास सुरु असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
- पोलिसांनी त्याला समजावले आणि आत्महत्या करण्यापासून रोखले.
करत होता मृत्यूचे LIVE टेलीकास्ट
- तपासात पोलिसांसमोर आले की सचिन हा व्हॉट्सअप आपल्या आत्महत्येचे LIVE अपडेट्स टाकत होता. त्याने आपले अनेक फोटो व्हॉट्सअप अपडेट केले होते.
- त्याचे हे LIVE अपडेटस पाहिल्यानंतर एका सतर्क नागरिकाने याची माहिती पोलिसांना दिली. सचिन प्रकृती व्यवस्थित असून आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल त्याला आता पश्चाताप होत आहे.
- पत्नी घरी येत नसल्याने त्याने हे पाऊल उचलले होते.

Post a Comment

 
Top