0
अशा कार्यक्रमात भक्तांना मिळतो राधे माँचा KISS अन् Hug करण्याची संधी

जालंधर - स्वत:ला देवीचा अवतार सांगणाऱ्या वादग्रस्त राधे माँवर FIR दाखल करण्याच्या मागण्यासंबंधी कोर्टाच्या अवमानना याचिकेवर पंजाब अँड हरियाणा हायकोर्टाने कपूरथळाच्या एसएसपी यांना नोटीस जारी करून उत्तर मागितले आहे. एका टीव्ही चॅनलशी बोलताना राधे माँचा माजी भक्त मुंबईचे प्रसिद्ध एमएम मिठाईवालाचे मालक मनमोहन गुप्ता यांनी राधे माँवर अनेक आरोप केले आहेत. ते म्हणाले की, राधे माँ ज्या चौकी (राधे माँचा दरबार) मध्ये जाते आणि आपल्या भक्तांना दर्शन देते त्याचा रेट निश्चित असतो.
राधे माँचे सर्व रेट ठरवतो एंजट टल्ली बाबा...
- मनमोहन गुप्ता यांनी आरोप केला की, राधे माँ ज्या चौकीत जाते आणि आपल्या भक्तांना दर्शन देते त्याचे रेट ठरलेले असतात.
- जो भक्त चौकीचा कार्यक्रम ठेवतो, त्याला राधे माँच्या चौकीचे रेट कार्ड दिले जाते. आणि त्याच्या वकुबानुसार राधे माँच्या फर्माईशी पूर्ण कराव्या लागतात.
- सूत्रांनुसार, सर्वात मोठ्या चौकीचे आयोजन करणाऱ्या भक्ताला राधे माँचा किस, तिला मिठीत घेण्याची आणि कडेवर उचलून घेण्याची खास संधी दिली जाते.
- भक्ताच्या आर्थिक सुबत्तेवरून चौकीचे रेट कमी-जास्त होऊ शकतात. चौकीचे आयोजनाचे सर्व व्यवहार राधे माँचा एजंट टल्ली बाबा करतो.
कोण आहे राधे माँ...
- राधे माँचा जन्म पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील एका शीख कुटुंबात झाला होता.
- राधे माँचे खरे नाव सुखविंदर आहे. तिचे लग्न 18 वर्षे वयातच मुकेरियाच्या मनमोहनसिंगशी झाले होते.
- लग्नानंतर एका महंताशी राधे माँची भेट झाली. नंतर तिने आध्यात्मिक जीवन स्वीकारले.
- काही काळानंतर ती मुंबईत आली आणि राधे माँ नावाने प्रसिद्ध झाली.
राधे माँवर लागले आहेत अनेक आरोप...
- स्वत:ला देवीचा अवतार सांगणाऱ्या राधे माँच्या विरोधात मुंबईच्या बोरिवली परिसरात गुन्हा दाखल आहे.
- राधे माँवर एका महिलेने तिचा पती आणि सासरच्यांकडून छळ चालवल्याचा आरोप आहे.
- बोरिवली पोलिसांनी याप्रकरणी राधे माँसह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. 
- 2015 मध्ये राधे माँची माजी भक्त आणि अभिनेत्री डॉली बिंद्राने राधे माँवर लैंगिक शोषण आणि धमकी दिल्याचा आरोप केला होता.
- आता सुरेंद्र मित्तल यांच्या तक्रारीवरून पुन्हा एकदा राधे माँच्या अडचणी वाढल्या आहेत. प्रकरणाचे गांभीर्य पाहून कोर्टाने कपूरथळा पोलिसांना फटकारले आहे.
- राम रहीम प्रकरणानंतर तमाम लोकांनी तऱ्हेतऱ्हेच्या ढोंगी बाबांविरुद्ध आघाडी उघडली आहे.

Post a Comment

 
Top