अलाहाबाद/गाजियाबाद - आरुषि आणि हेमराज मर्डर केसमध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात राजेश तलवार आणि नुपुर तलवार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर अलाहाबाद हायकोर्ट आज निर्णय देण्याची शक्यता आहे. 2013 मध्ये सीबीआय विशेष कोर्टाने तलवार दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला त्यांनी अलहाबाद हायकोर्टात आव्हान दिले आहे.
काय आहे प्रकरण
- 16 मे 2008 रोजी दिल्ली लगतच्या नोएडमधील जलवायू विहार येथील एका घरात 14 वर्षीय आरुषिचा खून झाला होता. गळाचिरून आरुषिची हत्या करण्यात आली होती. जवळपास साडेपाच वर्षे तपास केल्यानंतर सीबीआयच्या विशेष कोर्टाने या खून प्रकरणी आरुषिचे आई-वडील नुपुर आणि राजेश तलवार यांना दोषी ठरवले होते.
- आरुषि मर्डर केस बरेच दिवस माध्यमांमध्ये चर्चेत होती. आरुषिच्या हत्याऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी लोक रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या. त्यांनी या खून खटल्याचा तपास सीबीआयकडे सोपवला होता.
- सीबीआयने साडेपाच वर्षे तपास केल्यानंतर आरुषिचा खून तिच्याच आई-वडिलांनी केल्याचे दोषारोपपत्र दाखल केले. त्यांना 2013 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

किती जणांचा झाला होता खून?
- या प्रकरणात दोन जणांचा खून झाला होता. आरुषि आणि हेमराज (45) याचा खून झाला होता. आरुषिचा खून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हेमराजची बॉडी सापडली होती. विशेष म्हणजे तलवार दाम्पत्याच्या घराच्या छतावर एका कुलरमध्ये हेमराजचा मृतदेह होता. हेमराज हा तलवार दाम्पत्याच्या घरी काम करत होता.
Post a Comment