0

गुजरात दंगल : मोदींना क्लीनचीट देणाऱ्या निर्णायाविरोधात दाखल याचिका HC ने फेटाळली

अहमदाबाद - गोध्रा कांडानंतर भडकलेल्या गुजरात दंगल प्रकरणी नरेंद्र मोदी यांना क्लीनचीट देण्यात आली होती. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका गुजरात हायकोर्टाने फेटाळली आहे. ही याचिका दंगलीत मारलेल्या गेलेले काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी जकिया जाफरी यांनी दाखल केली होती.
रिव्ह्यू पिटिशन दाखल करणाऱ्यांमध्ये तिस्ता सेटलवाडही
- कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. हा निर्णय विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) तपासावर आधारीत होता. यामध्ये मोदींसह 56 आरोपींना क्लीनचीट देण्यात आली होती. 
- याचिकेत आरोप करण्यात आला होता की या दंगलीमागे मोठे गुन्हेगारी षडयंत्र रचण्यात आले होते. 
- रिव्ह्यू पिटीशन दाखल करणाऱ्यांमध्ये जाफरी यांच्या शिवाय सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांची एनजीओ सिटीजन फॉर जस्टिस अँड पीस यांचाही समावेश होता.
याचिकेत काय मागणी होती?
- मोदी यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि नोकरशहा असे एकूण 59 जण या गुन्हेगारी षडयंत्रात सहभागी असल्याचा आरोप होता. या सर्वांना आरोपी करण्यात आले होते. 
- याचिकेत मागणी करण्यात आली होती की दंगलीचा हायकोर्टाने नव्याने तपास करण्याचे आदेश द्यावे.
काय आहे प्रकरण?
- 27 फेब्रुवारी 2002 ला गुजरातमधील गोध्रा येथे साबरमती रेल्वेच्या कोचमध्ये जाळपोळ झाली होती. यात 59 लोक मारले गेले होते. यामध्ये बहुतेक अयोध्येवरुन परत येणारे कारसेवक होते. 
- त्यानंतर गुजरातमध्ये दंगल उसळली होती. यात जवळपास 1000 लोक मारले गेले होते. 
- डिसेंबर 2013 मध्ये अहमदाबाद हायकोर्टाने या प्रकरणी नरेंद्र मोदींसह 58 जणांना क्लीनचीट दिली होती.
गुलबर्ग सोसायटीत जाफरींसह 69 जणांची हत्या
- गुजरात दंगलीतील दहा मोठ्या हत्याकांडापैकी एक गुलबर्ग सोसायटी हत्याकांड होते. 
- 28 फेब्रुवारीला गुजरातमधील गुलबर्ग सोसायटीला जमावाने लक्ष्य केले होते. येथे जाफरी कुटुंबासह 69 जणांची हत्या करण्यात आली होती. येथे 39 जणांचे मृतदेह सापडले होते. उर्वरीत 30 जणांचे मृतदेह सापडले नव्हते. 7 वर्षानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले होते. 
- सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीत तयार करण्यात आलेल्या एसआयटीने या प्रकरणी तपास करुन 66 जणांना अटक केली होती.

Post a Comment

 
Top