0
आईने दिली GAY मुलाच्या लग्नासाठी जाहिरात; आता मुलाने सुरु केले आहे हे काम

मुंबई- दिल्ली, मुंबई समवेत देशातील 5 मोठ्या शहरांमध्ये एलजीबीटीक्यू फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला मुंबईत राहणाऱ्या हरीश अय्यर यांच्याविषयी माहिती देणार आहोत. हरीश हे समलैगिंकाच्या हककांसाठी लढणारे कार्यकर्ते आहेत. ते सध्या गेडियो हा रेडिओ शो सुध्दा होस्ट करतात. हा शो लेस्बियन, गे, एलजीबीटी समुहांच्या हक्कांविषयी चर्चा करतो. हरीश हे 2015 मध्ये तेव्हा चर्चेत आले जेव्हा त्यांच्या आईने त्याच्या लग्नासाठी वर्तमानपत्रात जाहिरात दिली.
काय आहे हरीशच्या रेडिओ शो मध्ये
- भारतात समलैगिकता या विषयावर खुल्या पध्दतीने चर्चा करण्यात येत नाही. समलैगिक संबंध असणाऱ्या देशात 10 वर्षाची शिक्षा होऊ शकते.
- 30 वर्षीय अय्यरने सांगितले की, एक कार्यकर्ता असल्याने मला या विषयावर बोलावे लागत आहे. या विषयावर काम करताना अनेक भावनात्मक प्रसंगांनाही सामोरे जावे लागते. अनेकदा त्यांना वाचविण्याचे काम करावे लागले. या शोत आम्ही त्यांचे प्रश्न मांडतो.
- हा रेडिओ शो इश्क नावाच्या एफएम चॅनलवर ऐकता येतो. तो मुंबई, दिल्ली आणि कोलकाता येथे ऐकता येतो. त्याची सुरुवात जुलैमध्ये करण्यात आली आहे.
- दोन तासाच्या या शो मध्ये एक शीख-मुस्लीम जोडपेही सामील झाले होते. त्यांनी सांगितले की ते 12 वर्षापुर्वी भेटले आणि त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.
कोण आहेत हरीश अय्यर?
- एक रेडिओ जॉकी, मोटिवेशनल स्पीकर, कॉलमनिस्ट, ओपिनियन मेकर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. 
- समलैगिकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या अनेक संघटनांनी त्यांना सन्मानित केले आहे.
- हरीश यांचे नाव 100 अतिशय प्रभावशाली LGBTIQ लोकांमध्ये सामील आहे. अनेक वर्तमानपत्रात आणि मासिकांमध्ये ते लिखाण करतात. ते एक यू टुयूब चॅनलही चालवतात.

Post a Comment

 
Top