0
फ्रॅक्चर न पाहताच हात प्लास्टर, अाता शस्त्रक्रियेचा सल्ला; सरकारी अाराेग्यसेवांच्या कारभाराचा महिलेला फटका

नाशिक - इएसअाय लाभधारक महिलेच्या फ्रॅक्चर झालेल्या हाताची याेेग्य तपासणी न करताच त्यावर जिल्हा रुग्णालयात माेफत केलेले प्लास्टर तिला चांगलेच महागात पडले अाहे. इएसअायच्या अस्थिराेगतज्ज्ञांनी वरवर तपासणी करून ‘सिव्हिल’मध्ये जाण्याचा सल्ला दिल्यानंतर तेथेही अावश्यक तपासणी न करताच हाताला प्लास्टर करण्यात अाले.
प्लास्टरनंतरही प्रचंड वेदना सहन करणाऱ्या महिलेचे प्लास्टर २८ दिवसांनी काढले असता फ्रॅक्चर ‘जैसे थे’च असल्याचे उघड झाले. सहज बरी हाेऊ शकणारी हाडाची जखम अाता जुनी झाल्यामुळे इएसअायने शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबईला जाण्याचा अजब सल्ला दिला अाहे.
अाैद्याेगिक वसाहतीत काम करणाऱ्या मनाेज सिंग या कामगाराची पत्नी बेबी सिंग या १४ अाॅगस्टला खाली पडल्याने त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले हाेते. त्या इएसअायच्या लाभधारक (विमा क्रमांक ३६००२६१९९१) असल्याने त्यांनी तेथील अस्थिराेगतज्ज्ञांकडे तपासणी केली. मुळात, तेथेच त्यांच्या हातावर तत्काळ उपचार हाेणे अावश्यक हाेते. मात्र, डाॅक्टरांनी उपचार करण्याएेवजी त्यांना थेट सिव्हिल हाॅस्पिटलला जाण्याचा सल्ला दिला. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार सिंग त्याच दिवशी सिव्हिल हाॅस्पिटलला गेल्या. तेथील डाॅक्टरांनीही इएसअायच्या डाॅक्टरांनी केसपेपरवर नमूद केल्याप्रमाणे फ्रॅक्चर असलेल्या भागावर प्लास्टर करण्याचा सल्ला दिला. कर्मचाऱ्यांनी हाताची तपासणी न करताच केवळ केसपेपरवरील उल्लेखानुसार हाताला प्लास्टर केले व २८ दिवसांनी प्लास्टर काढण्यासाठी येण्याचा सल्ला दिला.

या काळात रुग्णास प्रचंड त्रास हाेत हाेता. मात्र, इएसअायच्या डाॅक्टरांनी फक्त गाेळ्या-अाैषधे देऊन रुग्णाला घरी पाठविण्यातच धन्यता मानली. अखेर २८ दिवसांनी प्लास्टर काढल्यानंतर फ्रॅक्चर असलेल्या ठिकाणचे हाड व्यवस्थित जाेडले गेले की नाही, याची तपासणी करण्यासाठी एक्स रे काढला असता फ्रॅक्चर बरे झालेले नसल्याचे निष्पन्न झाले.
प्लास्टरने हाड जाेडणे सहजशक्य असतानाही इएसअाय सिव्हिलच्या हलगर्जीपणामुळे अाता त्या सामान्य स्थितीतील रुग्णावर शस्त्रक्रिया करावी लागणार अाहे. मात्र, या शस्त्रक्रियेसाठीही इएसअायच्या डाॅक्टरांनी थेट मुंबईला जाण्याचा सल्ला दिल्याने महिला तिचे कुटुंब पुरते हतबल झाले अाहे.
... मग दरमहा कपात कशासाठी? 
अाैद्याेगिक वसाहतीतील कामगारांच्या वेतनातून दरमहा लाखाे रुपयांची कपात हाेते. या माेबदल्यात कामगार त्यांच्या कुटुंबियांना अाराेग्यसेवा पुरविण्याची जबाबदारी इएसअायची अाहे. मात्र, या रुग्णालयात साधे फ्रॅक्चर असलेल्या रुग्णावरही उपचार हाेत नाही. अशा रुग्णांना सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला जाताे. जर सिव्हिललाच रुग्ण पाठवायचे असतील तर मग कामगारांच्या वेतनातून रक्कम कशासाठी कपात केली जाते, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला अाहे.
महिलेला मुंबईस शस्त्रक्रियेसाठी दिलेली सल्लानाेट.  

Post a Comment

 
Top