
मुंबई-रात्रंदिवस सलग सेवा देऊनही माेटरमनकडून तणावात घडणाऱ्या सिग्नल चुकवण्यासारख्या घटनांमुळे त्यांना थेट नाेकरीतूनच निष्कासित करण्याची धमकी रेल्वे प्रशासनाने दिली अाहे. त्याचा विराेध करण्यासाठी मध्य रेल्वेच्या माेटरमननी रविवारपासून अाेव्हरटाइम न करता नियमानुसार काम करण्याचा इशारा दिला अाहे. त्यामुळे एेन दिवाळीत मध्य रेल्वेच्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार अाहे.
मध्य रेल्वेच्या उपनगरीय लाेकलसेवेत दर चार मिनिटाला एक लाेकल याप्रमाणे १६०० पेक्षा जास्त लाेकल गाड्या राेज धावत असतात. सणासुदीच्या काळात तसेच भाैगाेलिक मर्यादा असताना प्रचंड तणावाखाली काम करूनही ६८६ माेटरमन लाखाे प्रवाशांना सुखरूपपणे अापल्या इच्छित स्थळापर्यंत पाेहोचवत असतात. अशा वेळी त्यांच्याकडून सिग्नल चुकविण्यासारख्या चुका घडल्यास कामावरून बडतर्फ करणे, सेवेतून निष्कासित करण्याची धमकी रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येत अाहे. यापूर्वी कधीही माेटरमनला सेवेतून निष्कासित केले जात नव्हते. परंतु अाता रेल्वे अधिकाऱ्यांनी माेटरमनला नाेकरीतून काढून टाकण्याचा तुघलकी निर्णय अमलात अाणण्याचा कुटिल डाव सुरू केला अाहे. जाेपर्यंत हा निर्णय मागे घेतला जात नाही ताेपर्यंत मध्य रेल्वेचे माेटरमन रविवार, १५ अाॅक्टाेबरपासून अतिरिक्त काम करणार नसल्याचा इशारा रेल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जाेशी दिला. माेटरमन हा अत्यंत तणावाखाली काम करत असल्याने त्याला पुरेसा अाराम मिळणे गरजेचे अाहे. परंतु तरीही ताे अाराम न करता काम करीत असताे. अशामध्ये माेटरमनकडून काही चूक झाल्यास त्याला नाेकरीवरून काढून टाकणे किंवा रेल्वे बाेर्डाच्या नियमांचा धाक दाखवून बंधनकारक सेवा निवृत्ती देण्यात येते. या संदर्भात तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, रेल्वे कामगार संघटनेचे अध्यक्ष खासदार अानंदराव अडसूळ यांच्याबराेबर अगाेदरही चर्चा झाली. अन्य माेटरमनच्या तुलनेत मुंबईतल्या माेटरमनच्या कामाचे स्वरूप वेगळे असल्याचे तत्त्वत: मान्य करून शिक्षेचे स्वरूप साैम्य असेल, असे अाश्वासन दिले.
Post a Comment