0

अंबरनाथमधील शांतीसदन रिसॉर्टमध्ये मौजमजा करण्यासाठी गेलेल्या ठाण्यातील सात महिलांना दूषित पाण्यामुळे प्रचंड त्रास झाला. घसा दुखणे, अंगावर रॅशेश येणे, चक्कर, उलटय़ा यामुळे या महिलांना तातडीने कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान शांतीसदन रिसॉर्टच्या विरोधात तक्रार करण्यात आली असून तेथील पाण्याचे नमुने तपासले जाणार आहेत.
ठाणे शहर व परिसरातील मैत्रिणींचा एक ग्रुप रविवारी सुट्टी असल्याने शांतीसदन रिसॉर्टमध्ये मौजमजा करण्यासाठी गेला होता. तेथील पाण्यात खेळून झाल्यानंतर अनेकांच्या अंगाला खाज सुटायला लागली तर काही जणांचा घसा दुखू लागला, चक्करदेखील आली. चैताली मढवी, लता मढवी, कल्पना मायतोंडे, हर्षिका मायतोंडे, भाग्यश्री मायतोंडे, कामिनी कोळी, पल्लवी भोईर आदींना कळवा हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

Post a Comment

 
Top