0

दोन प्रियकरांनी मिळून केली प्रेयसीची हत्या, दहा वर्षांनंतर घडले असे काही...




नाशिक-प्रियकराकडून प्रेयसीच्या खुनाच्या घटना घडतात. मात्र, प्रेयसीचा तिच्याच दाेन प्रियकरांनी खून करत तिचा मृतदेह चंदनपुरी घाटात फेकून दिला होता. या प्रकरणी मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही प्रियकरांना अटक केली आहे. २००८ मध्ये चंदनपुरी घाटात युवतीचा मृतदेह अाढळून आला होता. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तब्बल दहा वर्षांनंतर या खुनाला वाचा फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हडपसर (पुणे) येथील अर्चना सोनवणे ही आई-वडिलांचा विरोध असताना प्रतीक धारणे (रा. सिडको) याच्यासोबत रहात होती. दोघांनी मंदिरात लग्न केले होते. दोघे पुण्यातच विमाननगर परिसरात रहात होते. प्रतीक पुण्यात कंपनीमध्ये कामाला असल्याने त्याचा मित्र विनीत पुंडलिक झाल्टे (रा. सिडको) हा आणि त्याचा मामा माधवराव पिंपळसकर हे दोघे पुण्याला कामासाठी गेले. प्रतीकच्या घरी ते राहिले. प्रतीक आणि माधवराव कामावर जात असल्याने अर्चना आणि विनीत घरी रहात होते. याच कालावधीत दोघांचे सूत जमले. प्रतीकच्या निदर्शनास ही बाब आली. दोघा मित्रांमध्ये वाद झाले. विनीतने अर्चनासोबत लग्न करण्याची इच्छा दर्शवली मात्र, अर्चनाचा त्याच नकार हाेता. अर्चना प्रतीकला लग्नासाठी तगादा लावत असल्याने प्रतीकने घरच्यांना विचारून लग्न करू, असे सांगत विनीत त्याचा मामा माधवराव, प्रतीक अाणि अर्चना असे चौघे दोन दुचाकीने नाशिकला निघाले. चंदनपुरी घाटात थांबत विनीतने ओढणीच्या साह्याने अर्चनाचा गळा आवळून खून केला. मामाने त्यास मदत केली. मृतदेह दरीत फेकून दिल्याची कबुली प्रतीकने पोलिसांना दिली. तर दुसरीकडे विनीतने प्रतीकने गळा आवळल्याचे सांगत ‘तो मी नव्हेच’ असा बनाव केला. पोलिसांनी अापला खाक्या दाखवताच दोघांनी खूनाची कबुली दिली. सहायक आयुक्त अशोक नखाते, सहायक निरीक्षक सचिन सावंत, उपनिरीक्षक भीमराव गायकवाड, संजय गामणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

संगमनेर पोलिसांकडे ताबा
संशयित दोघा प्रियकरांचा संगमनेर तालुका पोलिसांनी ताबा घेतला अाहे. याप्रकरणी २००८ मध्ये अकस्मात आणि नंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अप्रामाणिकपणामुळे गेला बळी
एका मित्रासोबत प्रेमविवाह करून दुसऱ्या मित्राच्या प्रेमात पडल्याने प्रेयसी किती प्रामाणिक अाहे याबाबत शंका घेत दाेन्ही प्रियकर तिच्यावर नाराज होते. पुण्यात आणखी किती मुलांसोबत हिचे संबंध असतील, अशी शंका घेत या दाेन प्रियकरांनी प्रेयसीचा काटा काढला.

कायद्याच्या नजरेतून कोणीही सुटत नाही...
कायद्यापुढे काेणी मोठे नाही. प्रेयसीचा खून केल्यानंतर दोघे पुणे शिर्डी येथे नोकरी करत होते. दहा वर्षांपासून आपण काही केलेच नाही, अशा अाविर्भावात ते हाेते. मात्र, पोलिसांच्या नजरेतून कुठलाही गुन्हेगार सुटू शकत नाही.

आई-वडील अनभिज्ञ
अर्चनानेकुटुंबीयांचा विराेध असूनही प्रेमविवाह केल्याने तिच्यासोबत त्यांनी नाते तोडले हाेते. ती त्या मुलासोबत रहात असल्याने तिच्याशी कधीच संपर्क ठेवला नाही. २००८ मध्ये अर्चनाचा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर आई-वडिलांना धक्का बसला.

Post a Comment

 
Top