महासमुंद (छत्तीसगड)- अध्यात्मिक गुरु आसाराम बापू यांच्या समर्थकांनी छत्तीसगडमधील शाळांमध्ये सेक्स टिप्स देणारे पुस्तकांचे वाटप केले होते. लैंगिक शिक्षणाच्या नावाखाली पुस्तकात वादग्रस्त मजकूर लिहिला होता. दरम्यान, सरकारने ही परीक्षा रद्द केली होती. हे प्रकरण मागील वर्षी उघडकीस आले होते. परंतु हे पुस्तक बहुतांश विद्यार्थ्यांच्या हातात पडले आहे.
‘दिव्य प्रेरणा प्रकाश’ असे या पुस्तकाचे नाव आहे. पुस्तकात सेक्स पावर वाढवण्याच्या विविध टीप्स देण्यात आल्या होत्या. मुखपृष्ठावर श्री हनुमान व इतर महापुरूषांचे फोटो आहेत.
काही शाळांमध्ये झाल्या होत्या परीक्षा
या पुस्तकाच्या आधारावर आसाराम समर्थकांनी महासमुंदमधील काही शाळांमध्ये परीक्षा घेतल्या. छत्तीसगड सरकारच्या एका पत्रानुसार, जेलमध्ये बंद असलेल्या आसारामची प्रतिमा सुधारण्यासाठी समर्थकांनी ही पावले उचलले आहेत. समर्थकांनी जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडून परीक्षा घेण्यासंदर्भात परवानगीही मिळवली होती. मात्र हा प्रकार समोर आल्याने शिक्षण विभागाने परीक्षाच रद्द करण्याचे आदेश दिले होते.
महासमुंद जिल्ह्यात 5 हजार पुस्तकांचे वाटप
परीक्षा रद्द झाली असली तरी, अभ्यासक्रमाची पुस्तके शाळांमध्ये वितरीत करण्यात आली होती. केवळ महासमुंद जिल्ह्यात 5 हजार पुस्तकांचे वाटप करण्यात आले होते.
पाच शाळांमध्ये झाली परीक्षा
महासमुंद आणि परिसरातील शाळांमध्ये आसाराम यांच्या समर्थकांकडून परीक्षा घेण्यात आली होती. योग वेदांत सेवा समितिच्या सदस्यांनी दावा केला की, शाळांनी परीक्षा घेण्यास परवानगी दिली. त्यासाठी मुलांकडून परीक्षा शुल्कही घेतले नाही.

Post a Comment