0


मुंबई-कलर्स टिव्‍ही वरील विवादीत शो बिगबॉस सिझन 11 सुरू होऊन काही दिवसच उलटले आहेत. शोच्‍या पहिल्‍या दिवसापासून स्‍पर्धकांमध्‍ये वादाला सुरवात झाली आहे. या आठवड्यात स्‍वत:ला दाऊदचा नातेवाईक सागणारा जुबैर खान हा सर्वाधीक विवादात राहीला आहे. शोच्‍या दरम्‍यान जुबेरन अनेक वेळा अश्‍लील भाषेचा वापर केला, या कारणाने अभीनेता सलमान खान याने त्‍याला चागलेच फटकारले होते. याच कारणाने नाराज झालेल्‍या जुबेरने आत्‍महत्‍या करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. त्‍याच्‍यावर आता उपचार सुरू असून त्‍याची प्रकृती स्‍थीर आहे.
स्‍वता:ला दाऊदचा नातेवाईक सांगणारा जुबैर खान हा शोच्‍या पहिल्‍या दिवसापासुनच आपल्‍या बोलण्‍याने वादात राहीला. शोच्‍या अन्‍य प्रतीस्‍पर्धी सपना चौधरी, पुनीश शर्मा, अर्शी खान, यांच्‍या सोबत वाद घातल्‍याने व अश्‍लील भाषेचा वापर केल्‍याने सलमान खान याने जुबेरला चागलेच फटकारले होते. जुबेर हा दाऊदचा कोनी लागत नसुन इतरांना घाबरवण्‍यासाठी तो दाऊदच्‍या नावाचा वापर करत असल्‍याचे सलमान यावेळी म्‍हणाला होता. या प्रकाराने नाराज झालेल्‍या जुबेरने हाईडोजचे औषध सेवन केले ज्‍यानंतर त्‍याला दवाखाण्‍यात भर्ती करण्‍यात आले होते.

Post a Comment

 
Top