0

भोपाळ -20 वर्षीय तरुणीला किडनॅप करून तिच्यावर रेप आणि टॉर्चर केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पीडितेने आरोपींच्या ताब्यातून सुटून पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर आरोपी आणि त्याच्या आईला अटक करण्यात आली आहे. तरुणीने बस कंडक्टरविरुद्ध अपहरण करून रेप करणे, मारहाण आणि सिगारेटने चटके दिल्याची तक्रार केली आहे.
अशी निसटली नराधमाच्या तावडीतून...
- आरोपींच्या तावडीतून निसटण्यासाठी तरुणीने नवरात्रीसाठी घरी जाण्याचा बहाणा केला.
- तिने आरोपींना विश्वास दिला की लगेच दुसऱ्या दिवशी परत येईन. 29 सप्टेंबरला ती पाटणीपुराहून निघाली आणि आष्ट्याला आली.
- येथे तिने पूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. पोलिसांनी आई- मुलगा दोघांनाही आरोपी केले आहे.
- आष्टा पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.

Post a Comment

 
Top