0

गोरखपूर - येथे एका विवाहितेने आपल्या प्रियकरासह मिळून पतीचा खून केला. जगाच्या नजरेत ती पतीसाठी करवाचौथ करायची, पण प्रियकराचा फोटो पाहूनच उपवास सोडायची. 8 ऑक्टोबरला करवाचौथ देशभरात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ही दुर्दैवी घटना शेअर करत आहोत.यूपीच्या गोरखपूरमध्ये 20 जुलैला केंट पोलिसांनी विवेक मर्डर केसची चार्जशीट दाखल केली. न्यूज पेपरमध्ये काम करणाऱ्या विवेकच्या हत्येने मोठी खळबळ उडाली होती. अवघ्या 12 तासांतच पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावून आरोपींना गजाआड केले. या प्रकरणातील पोलिसांचा तत्पर तपास आणि आरोपींच्या क्रौर्याचा हा 'डिट्टेल' पंचनामा...

22 एप्रिल 2017. गोरखपूरमधील केंट परिसर. पोलिसांच्या नाइट पेट्रोलिंग टीमला पाहून काही दुचाकीस्वार एका मृतदेहाला फेकून पळून जातात. पोलिस 5 किमीपर्यंत पाठलाग करतात आणि अखेर त्यांना अटक करतात. दुचाकीस्वारांपैकी काही पळूनही जातात. मृतदेहाची ओळख पटल्यावर तो विशुनपुरवाचे रहिवासी विवेक प्रताप सिंह (35) असल्याचे कळते. पुढच्या 12 तासांनीच केंटचे सीओ अभय कुमार या प्रकरणाचा उलगडा करतात. विवेकचा खून त्याच्या पत्नीने प्रियकरासह मिळून केला. प्रियकराला विवेकच्या 6 वर्षांच्या मुलालाही मारायचे
असते, पण सुषमा यावर धक्कादायक उत्तर देते... ते ऐकून आरोपी हैराण होतो, कारण याआधी सुषमाने याबाबत कधीच काही सांगितलेले नव्हते.
खुनाच्या वेळी शेजारच्या खोलीत झोपले होते काका-काकू
> विवेक प्रताप सिंह पत्नी सुषमा सिंह आणि मुलासह घराच्या फर्स्ट फ्लोअरवर राहायचा.
> घटनेच्या वेळी शेजारच्या दोन खोल्यांत त्याचे काका आपल्या कुटुंबासह झोपले होते. मृताचे वडील देवेंद्र प्रतापही पत्नी आणि इतर नातेवाइकांसह गाढ झोपेत होते.
> विवेक सिंह एका वृत्तपत्रात डिस्ट्रिब्युशन सेक्शनमध्ये काम करायचा. तो रोज सकाळी 3 ते 4
वाजेदरम्यान फील्डवर कामासाठी जायचा. संध्याकाळी लवकर परत येत होता आणि रात्री 10 पर्यंत झोपीही जायचा.
प्रकरणाचे करंट स्टेटस
> केंटचे इन्स्पेक्टर ओमहरी बाजपेयींनी सांगितले की, पत्नी सुषमा तिचा प्रियकर कामेश्वर सिंह ऊर्फ डब्ल्यू सिंह सहित सर्व आरोपींची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. आरोपींविरोधात 20 जुलै 2017 रोजी कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे.
> दुसरीकडे, मृताचे वडील म्हणाले की, पोलिसांनी गांभीर्याने न घेतल्यामुळे आरोपींपैकी एक मुकेशला जामीन मिळाला आहे. चार्जशीटची कॉपी मिळाल्यावर ते पुन्हा या प्रकरणात अर्ज करणार आहेत.
> पोलिसांनी विवेकचा मुलगा आरुषचाही जबाब घेतला. आरुष सध्या आपल्या आजोबा-आजींकडे राहतोय.

Post a Comment

 
Top