0
रात्रभर झाेपले नाही तलवार दांपत्य; हनुमान चालिसाचा केला पाठ; भाेजनही केले कमी+

गाझियाबाद-अारुषी हत्या प्रकरणाचा निकाल लागण्याच्या दाेन दिवसांपूर्वीपासूनच गाझियाबादमधील डासना कारागृहात कैद असलेल्या तलवार दांपत्याची दिनचर्या बदलली हाेती. दाेघेही सहकारी कैद्यांशी बाेलतदेखील नव्हते. त्यांचा अधिकाधिक वेळ गुरुवाणी व हनुमान चालिसाचा पाठ करण्यात जात हाेता.

मंगळवारी रात्री : नूपुर सर्वसामान्यपणे ९.३० वाजेपर्यंत झाेपी जात हाेती; परंतु मंगळवारी ती १० वाजेनंतर झाेपली. राजेशही सर्व सहकारी कैद्यांशी कमीच बाेलला.
बुधवारी सकाळी : नूपुरने राेजची कामे संपवल्यानंतर मुलांना शिकवले.
बुधवारी दुपारी : नूपुरने डाळ-चपाती खाल्ली. सहकारी कैदी तिला या निकालाबाबत समजावत हाेत्या. दुसरीकडे राजेशनेही कारागृहातील पाेलिसांना डाेके दुखत असल्याचे सांगितले.
बुधवारी रात्री : नूपुर बैचेन दिसत हाेती. त्यामुळे उशिरापर्यंत झाेपली नाही. अनेकदा गुरुवाणी व शबदचा पाठ केला. राजेशचा बीपी वाढला हाेता. ताे ३ ते ६ तासच झाेपला.
गुरुवारी सकाळी : नूपुर सकाळी ६ वाजता उठली. तसेच दैनंदिन कामे संपवून पूजेला बसली. त्यानंतर तिने बातम्या पाहिल्या. राजेशने अंघाेळीनंतर एक तासापर्यंत हनुमान चालिसा, हनुमानाष्टक व बजरंगबाण यांचा जप केला व बातम्या पाहिल्या. तसेच सकाळी ८.३० वाजता नूपुरने चहा पिऊन नाष्टा केला. सकाळी १० वाजता तिने बराकीत बंद असलेल्या महिलांच्या मुलांना शिकवले, तर राजेशने रुग्णांना पाहिले. २ वाजता नूपुरने गुरुवाणी, तर राजेशने हनुमान चालिसा वाचली.

चारित्र्यावर शंका उपस्थित झाली तेव्हा : वकिलाचा दावा
जज साहेब, तुम्ही भगवान आहात. पण तुमच्या वरही भगवान आहे. ती फक्त १३ वर्षांची होती हे लक्षात घ्या. आम्हाला फाशी देऊन टाका..पण कलंक कायम राहील. चारित्र्यावर खूप बोलले गेले.

प्रियंकाने दिला नूपुरला आधार
डासना तुरुंगात नूपुरसोबत प्रियंका ४ वर्षे राहिली. तिच्यावर चुलत भावाच्या हत्येचा आरोप होता. तिच्या मते, नूपुर महिला कैद्यांना शिकवायची. तिच्या वर्तणुकीवरून सहज लक्षात येत होते की, ती मुलीची हत्या करू शकत नाही.

राधिकाने दोन वर्षांत १२ हजार ट्विट केले
अारुषी-हेमराज हत्या प्रकरणी सोशल मीडियावरून न्यायाची लढाई लढली गेली. अमेरिकेच्या राधिका राजमानीने या मुद्द्यावर रोज ट्विट केले. तिने दोन वर्षांत १२ हजारांपेक्षा जास्त ट्विट केले.

- फेसबुकवर जस्टिस फॉर आरुषी नावाने पेज, न्यायासाठी मोहीम राबवली.
- आरुषीवर ‘तलवार’ चित्रपट आणि अनेक पुस्तकेही प्रकाशित झाली.
सीबीआय तपासाच्या प्रक्रियेवर ४ प्रश्न उपस्थित
- ऑनर किलिंगची सबब
सीबीआयच्या म्हणण्यानुसार घरात कोणीही बाहेरचा येऊ शकत नव्हता, मात्र अहवालानुसार हत्येच्या दिवशी घरात बाहेरील व्यक्ती आला होता.
- गोल्फ स्टिकवर प्रश्नचिन्ह 
सीबीआयच्या म्हणण्यानुसार गाेल्फ स्टिकने हत्या झाली. पुढे साफसफाई केली. परंतु सुनावणीत सीबीआयने दुसरी स्टिक सादर केली.
- अधिकाऱ्यांवर प्रश्न 
सीबीआयने तलवार दांपत्याशी हेमराज नावाच्या ई-मेलने संपर्क साधला. त्यावरून अधिकाऱ्यांच्या विचारसरणीवर सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह आहेत.
- १४१ च्या जागी ३९ साक्षीदार 
सीबीआयने तलवार दांपत्याच्या विरोधात खटला मजबूत होईल, अशा साक्षीदारांना पेश केले नाही. ३९ साक्षीदार पेश झाले होते.

Post a Comment

 
Top