0


Image result for buldhana police
बुलढाणा : खामगाव शासकीय रुग्णालयातून दोन दिवसाचे  बाळ एका महिलेने 23 तारखेला रात्रि 2 वाजताच्या सुमारास चोरुन नेले होते , त्या बाळाचा शोध लावण्यात पोलिसांना यश मिळाले असून बाळ दिल्ली येथे सापडले आहे व त्यासोबत सहा आरोपिना सुद्धा अटक करण्यात आली आहे
शासकीय रुग्णालयातून बाळ चोरी करीत असताना रुगनालायातील सीसीटीव्ही मद्धे कैद झाले होते त्यानुसार सीसीटीवी च्या फुटेज वरुण बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने तपास चक्र फिरवन्यात आले व तब्बल आठ दिवसानंतर बाळाला शोधन्यात पोलिसांना यश मिळाले
जिल्हा पोलिस अधीक्षक शशिकुमार मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली  स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी शिकारे यांच्या टीम ने शोध मोहिम राबविली आहे
चोरी गेलेलं बाळ दिल्लीला सापडले, बाळ हे विकण्याच्या दृष्टीने केले होते चोरी, पोलिसांनी मुख्य आरोपी सह 6 आरोपीना अटक केली आहे , मुख्य आरोपी मोहसीन हुसेन खान , पत्नी प्रीती दाविद गायकवाड हे दोन्ही खामगाव चे राहणारे आहेत, तर बाळ विकत घेणारे आरोपी महिला औरंगाबाद येथील मल्लिका बेगम पठाण हिम्मत खान, आणि फिरदोस अस्लम आसमानी ,दिल्ली तर आरोपी चालक  राजे जहांगीर खान आणि इरफान खान बशीर खान हे दोघेही औरंगाबाद चे आहेत अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक शशिकुमार मीणा यानी दिली आहे अनिलसिंग चव्हाण प्रतिनिधी बुलढाणा

Post a Comment

 
Top