0


- 7वीची विद्यार्थिनीला नापास करण्याची धमकी देऊन तिच्यावर पाशवी अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला कोर्टाने दोषी ठरवून 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विद्यार्थिनीवर झालेल्या अनाचारानंतर कोर्टाच्या या निर्णयामुळे पीडित कुटुंबाने समाधान व्यक्त केले आहे.
असे आहे पूर्ण प्रकरण...
- हे प्रकरण कोरिया जिल्ह्यातील भैंसवार गावातील एका शाळेचे आहे. येथे शिकवणाऱ्या एका शिक्षकाने 7व्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला नापास करण्याची धमकी दिली आणि तिच्यावर बळजबरी अत्याचार केले.
- विद्यार्थिनी एका लग्नसमारंभात गेली होती. तेवढ्यात तिथे तिला शिक्षक भेटला आणि गिफ्ट देतो म्हणून बाहेर घेऊन गेला. बाहेर झुडपांच्या आडोशाला त्याने तिच्यावर बलात्कार केला. कुणाला सांगितल्यास परीक्षेत नापास करण्याचीही धमकी दिली.
- तो नेहमी मुलगी घरात एकटी असल्यावर बलात्कार करायचा. विद्यार्थिनी रडून- हात जोडून त्याला विरोध करत होती, पण त्याने ऐकले नाही. एक दिवस विद्यार्थिनीने कुटुंबीयांना हे दररोजचे अत्याचार सांगितले.
- शिक्षकाने शेवटचे जानेवारी 2016 मध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार केला होता. कुटुंबीयांनी पोलिसांत याची तक्रार दिली.
- शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण दाखल केले. या प्रकरणात कोर्टाने आरोपी शिक्षाला दोषी ठरवले आणि अनेक कलमांखाली 1500 रुपये आर्थिक दंड आणि 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

Post a Comment

 
Top